आप्पासाहेब पाटील सोलापूर : गरीब कुटुंब... सर्वसामान्य लोक़..सामाजिक कार्याचं उगमस्थाऩ़़ देशभक्तांचं पवित्र स्थाऩ़..सर्वधर्मसमभावाचा आदर्श घालून दिलेले रहिवासी़.. शिपाई पदापासून ते उच्च पदस्थ अधिकारी पदाच्या खुर्चीवर विराजमान झालेली सुशिक्षित मंडळी अशा एक नव्हे तर अनेक गुणांनी संपन्न असलेल्या निराळे वस्तीचं कौतुक करावं तेवढं थोडंच बरं का..
सोलापूर शहराच्या प्रवेशद्वाराशेजारी झोपडपट्टींनी वसलेलं छोटं गाव म्हणजेच निराळे वस्ती. शहराच्या बाहेर असलेल्या वस्तीनं आता शहराच्या मध्यभागाचे स्थान निर्माण केलं आहे़ स्वातंत्र्यपूर्व काळात कै. गोविंदराज उंब्रजकर व कै.अंबादास दाजीबा सुरवसे यांनी निराळे वस्तीची स्थापना केली़ या काळात हैदराबाद मुक्ती संग्रामातील रजाकार याठिकाणी वास्तव्यास होते़ त्याकाळी या वस्तीत दीडशेहून अधिक जवानांची फौज तयार झाली़ सैन्यदलात आवश्यक असल्यास सोलापूरच्या निराळे वस्तीमधून जवानांना पाचारण करू, असे पत्र दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना पाठविले होते़ याच काळी सन्मानाची वागणूक न देणाºया रजाकारांना या जवानांना पळवून लावण्यात यश मिळविले.
१९५२ सालापासून कै . अंबादास दाजीबा सुरवसे यांनी या वस्तीची धुरा सांभाळली होती़ त्यांनी येथील नागरिकांनी दिलेल्या विश्वासाच्या जोरावर नगरपालिका व महापालिकेत सर्व पदांवर काम केले. एवढेच नव्हे तर त्यांनी स्थायी समितीचे चेअरमनपदही भूषविलं होत.
१९८५ नंतर युवकांनी कै . अंबादास सुरवसे यांना विश्रांती देण्याच्या उद्देशाने मनोहर सपाटे यांच्या हाती सूत्रे दिली़ त्यांनाही या वस्तीमधील मतदारांनी तीन वेळा मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं़ सपाटे यांनी महापौर पदासह अनेक पदे भूषविली. लातूर येथे झालेल्या भूकंपात प्रथम मदतीचा हात सपाटे यांनी क्रांती तरुण मंडळाच्या माध्यमातून दिला. या वस्तीत वाल्मीकी आवास योजनेंतर्गत ४०० हून अधिक पक्क्या घरांची निर्मिती झाली, त्यातून वस्तीचं रूपडं पालटलं़
सर्वच जाती-धर्मातील लोकांची वस्ती...सोलापूर शहराच्या प्रवेशद्वाराशेजारी वसलेल्या या निराळे वस्तीत सर्वच जाती-धर्माचे लोक एकत्र राहतात़ सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्ष भावनेने एकमेकांना मदत करण्यात या भागातील लोकांचा हातखंडा आहे़ क्रांती तरुण मंडळ, जय महाराष्ट्र मंडळ, अष्टभुजा नवरात्र मंडळ आदी समूहाच्या माध्यमातून सर्वच धार्मीयांचे सण, उत्सव साजरे केले जातात़ यासाठी शंकर सरवदे, राजेंद्र घुले, तानाजी शिंदे, केशव व्यवहारे, गणेश सरवदे, नागनाथ मंडलिक, दत्तात्रय शिंदे, नागनाथ जाधव आदी मंडळी प्रयत्नशील असतात़ याशिवाय महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे जाळे निर्माण केले आहे.
हे आहेत या भागातील शिलेदार- झोपडपट्टीत राहून अंधाराचा सामना करीत रात्रंदिवस कष्ट़़़ मनात मोठे होण्याचे स्वप्ऩ़़ उच्चपदी विराजमान होण्याचे ध्येय बाळगत अनेकांनी मार्गक्रमण केले़ त्यात यशस्वीही झाले़ यात बाजीराव ढमाळ (शिक्षणमहर्षी), कै. दयालसिंग के. पवार (न्यायाधीश), कै. बाबुलाल मोगल (कोषागार अधिकारी), बाबुलाल मोगल, कै. बजरंग गाडेकर, कै. सुनील गायकवाड, कै. प्रा़ घुले, आवारे गुरुजी, बंडगर गुरुजी, चव्हाण गुरुजी, शकुंतला हजारे, हरिभाऊ गायकवाड, रेखा सपाटे, नागनाथ जाधव (उद्योगपती), एकनाथ घाडगे, भोलेनाथ हजारे, बजरंग आवताडे, हणमंतू भिसळके, पोपट शिंदे (प्राध्यापक), ह़भ़प. अनंत महाराज इंगळे, प्रा़ तुकाराम हजारे, लिंबाजी सुरवसे, नागनाथ सुरवसे, प्रसाद खरसडे, प्रा़ अनिता माने व सैन्य दलातील कै. रामभाऊ कांबळे, बब्रुवाहन कांबळे, दयानंद कांबळे, उद्योग मस्के आदींचा समावेश आहे.
शहराच्या निर्णायक विषयांची चर्चा याच वस्तीतून- १९५२ सालापासून कै . अंबादास सुरवसे यांनी विविध पदांवर काम केले़ अभ्यासू, सर्वांना सोबत घेऊन काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती़ त्या काळी सोलापूर शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा व विचारविनिमय करण्यासाठी विश्वनाथ भोगडे, विश्वनाथ बनशेट्टी, गंगाधर कुचन, चिप्पा आदी मंडळी याच वस्तीत येत होती़ या चर्चेतून झालेल्या निर्णायक विषयाने शहरातील विकासाची सूत्रे त्या काळी हलत होती.
आता शिवसेनेचे पॅनल...- मनोहर सपाटे यांना या वस्तीमधील मतदारांनी तीन वेळा मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिले़ मतदारांनी दिलेल्या विश्वासाला ते पात्रही ठरले़ तद्नंतर फेबु्रवारी २०१७ साली प्रभाग ७ मधून सपाटे यांचा पराभव झाला़ आता पूर्णपणे या वस्तीत शिवसेनेचे पॅनल आहे़