शहरातील आजपर्यंत विविध कामे शहरात राबविली. यामुळेच ‘स्वच्छ भारत अभियानात’ ‘क’ वर्ग असलेल्या करमाळा नगर परिषदेने सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आला आहे. शहरातील डांबरीकरण व काँक्रिटीकरणासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजना अनुदानातून २ कोटी ५४ लाख २ हजार ३८९ रुपये, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अंतर्गत ३ कोटी ७९ लाख ३६ हजार ९७२ रुपये, रस्ता अनुदान योजना अंतर्गत ४१ लाख २७ हजार १३२ रुपये, नागरी दलितेतर वस्ती सुधारणा योजना अंतर्गत ७२ लाख ३१ हजार २५१ रुपये, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत २ कोटी २९ लाख ९६ हजार १६५ रुपये असे एकूण मिळून ९ कोटी ७६ लाख ९३ हजार ९०९ रुपयांचा निधी विविध खात्यांद्वारे उपलब्ध केला. या माध्यमातून ज्या त्या कामांच्या वर्कऑर्डरही काढण्यात आल्या असून लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असल्याने नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.
यावेळी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, बाळासाहेब बलदोटा, बाळासाहेब कांबळे उपस्थित होते.
---
तांत्रिक अडचणीमुळे विलंब
ही कामे लवकरच सुरू होणार होती परंतु काही तांत्रिक अडचणी असल्याने आता ही कामे लवकरच पूर्ण करून घेऊन शहरातील जनतेला होत असलेला त्रास दूर होईल. ६ कोटी ४४ लाख ४० हजार १४६ रुपयांची प्रस्तावित कामे असून त्याचीही लवकरच मंजुरी मिळेल, यामध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत ३ कोटी ७५ लाख १५ हजार ५४९ रुपये व महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना अंतर्गत २ कोटी ६९ लाख २४ हजार ५९७ रुपये असा एकूण १६ कोटी २१ लाख ३४ हजार ५५ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आता करमाळा शहरातील एकही रस्ता अगर गल्लीबोळ आम्ही डांबरीकरण, काँक्रिटीकरण, पेव्हिंग ब्लॉक यापासून वंचित ठेवणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
-----