सोलापूर- चॅरिटी कमिश्नर अंतर्गत नोंदणी असलेले रुग्णालय योग्य सेवा देत नसल्याची तक्रार रुग्णांकडून येत आहे. चॅरिटी अंतर्गत नोंद असलेले रुग्णालय गारिब रुग्णांना राखीव असलेले १० टक्के बेड देत नाहीत अशी तक्रार येत आहे. त्यामुळे लवकरच बैठक घेतली जाईल आणि त्या बैठकीत संबंधित रुग्णांना समज देण्यात येईल, असं मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले. त्यांनी आज सोलापूर दौरा केला.
बैठक घेऊन सुध्दा रुग्णांना बेड उपलब्ध करुन दिले नाही, तर त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई केली जाईल, असा सूचक इशारा देखील मंगेश चिवटे यांनी दिला. तसेच या बैठकीत त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेणार असल्याचे मंगेश चिवटे यांनी स्पष्ट केले. दरम्यान सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रशासनाची आणि रुग्णालयच्या संचालक किंवा विश्वस्त यांची बैठक घेतली जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.