सुरुवातीला सरकारी बस व खाजगी वाहनातील प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत होती त्यात आणखी कडक निर्बंध घालण्यात आल्याचे तहसिलदार यल्लप्पा सुभेदार यांनी सांगितले. आळंंद तालुक्यातील हिरोळी वागदरी सीमेवरील तपासणी नाक्याला भेट देऊन तहसीलदारांनी कडक सूचना केली.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ अभयकुमार कुलकर्णी, आर आय शरणबसप्पा हक्के आदी उपस्थित होते.
---
आळंद तालुक्यात तीन पथके
आळंद तालुक्यात हिरोळी, खजूरी व निंबाळ येथे सीमा तपासणी नाके उभारण्यात आले असून अन्य लहान मार्गाने महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनीही कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत सरकारच्या सूचना व आदेशांचे पालन करावे असे आवाहन केले जात आहे.
--
आळंंद तालुक्यातील हिरोळी- वागदरी सीमेवरील तपासणी नाक्याला भेट देऊन कर्मचाऱ्यांना सूचना करताना तहसीलदार यल्लप्पा सुभेदार. शेजारी आरोग्य अधिकारी डॉ. अभयकुमार.