सोलापूर/ पंढरपूर दि ६ : शेतकरी आंदोलनाचे जसेजसे दिवस वाढत चालले आहे़ तसेतसे आंदोलनाला हिंसक वळणही लागत चालले आहे़ तसाच प्रकार पंढरपूर तालुक्यात शेतकरी संपाच्या सहाव्या दिवशी घडला़ पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या समोरचच एका दूध संस्थेच्या चेअरमनने शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यास जबर मारहाण केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी घडली आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या समोर अजनसोंड (ता. पंढरपूर) येथील एका दूध संस्थेच्या चेअरमनने व अन्य काहिंनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यास दमदाटी करून मारहाण केले़ दूध संस्थेचे चेअरमन रोहन घाडगे व रमेश घाडगे आणि सुमित रोहन घाडगे यांनी हनुमंत बजरंग डुबल (रा. अजनसोंड ता. पंढरपूर) यांना दमदाटी करून मारहाण केली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे़ जखमींवर जनकल्याण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत़ याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते़ याबाबत ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना विचारले असता या मारहाणीत आंदोलनाचा काहीही संबंध नाही. गावातील दोन गटाचा वाद असुन शेतकरी संपाचा फायदा घेत वेगळे वळण देण्याचा प्रयत्न होतोय. आमचा तपास सुरु असल्याचे पोलीस ठाण्यांनी सांगितले आहे़
पंढरपूरात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण, आंदोलनाची तीव्रता वाढली
By admin | Published: June 06, 2017 3:05 PM