यावेळी अशोक सब्बन, हेरंब कुलकर्णी, रंजना गवांदे, भाऊसाहेब येवले, संतोष मुतडक, अमोल घोलप, कारभारी गरड, बाळासाहेब मालुजकर, संदीप दराडे, मारुती शेळके, जालिंदर बोडके, मनीष देशपांडे उपस्थित होते.
निवडणुका या काही कालावधीपुरत्या असतील, पण त्यामध्ये जडलेले व्यसन हे आयुष्यभर टिकून राहील. निवडणुकीच्या काळात फुकट दारू पिणाऱ्यांना नंतर स्वखर्चाने दारू प्यावी लागणार आहे, याचे भान ठेवून गावातील सर्व आघाड्यांनी व नागरिकांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन समज द्यावी. दारू पिणाऱ्या उमेदवारांच्या तक्रारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे कराव्यात.
राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनीसुद्धा दारू वाहतूक तसेच हॉटेलची वेळ संपल्यानंतर रात्री हॉटेल उघडी ठेवणाऱ्या व अवैध दारूची विक्री करणाऱ्यांवर लक्ष ठेवून कडक कारवाई करावी, अशी मागणी आंदोलक कार्यकर्त्यांनी केले आहे.