आज कलियुग आले आहे. आपल्यामधील दुःख, वाईटपण, त्रास व संकटे ही डोके वर काढत आहेत. अशावेळी स्वतःचीच स्वतःशी झुंज आहे असे वाटत आहे. आज प्रत्येक जण जगण्यासाठी संघर्ष करत आहे. कोणताही व्यक्ती आज सुख शोधायच्या मार्गावर आहे. दुःखात उभारत सुःख कुठे मिळते का याची वाट पाहत आहेत. जणू आत्म्याच्या भेटीला सर्व व्यक्ती व्याकूळ आहेत. अशावेळी नवीन काय करावे जेणेकरून प्रेम मिळेल असे वाटत आहे. सर्व जग जेव्हा पैशाच्या मागे पळत आहे, तेव्हा व्यक्ती स्वतःलाच विसरून गेला आहे. जगण्यासाठी पैसा तर लागतोच, पण सुखदेखील लागते, हे तो विसरत चालला आहे. मनुष्य आज फक्त स्वतःपुरता विचार करतोय. याचाच दूरगामी परिणाम म्हणजे माणसे तुटली जातात आणि दुःख मार्गी येते.
आज तंत्रज्ञानाच्या युगात व्यक्ती, लोक अगदी प्राणीसुद्धा मार्केटिंग दुनियेच्या आहारी गेल्यासारखे वाटत आहे. अति संवेदनशीलता माणसाला वाईट मार्गावर घेऊन जात आहे. अशा वेळी स्वतःच्या मनात डोकावणे गरजेचे आहे. जेवढे प्रेम आपण लोकांना देतो, त्याच्याहून जास्त प्रेम आपण स्वतःवर केले पाहिजेत. स्वतःपुरते नाही तर या जगात स्वतःची ओळख करण्यासाठी आणि या आयुष्याचा उपभोग घेण्यासाठी करावे.
आज शेतकरी हवालदिल झाला आहे. मालाला भाव नाही. पावसाचा भरोसा नाही. स्वतःच्या कष्टावर जरी विश्वास असला तरी परिस्थिती वाईट झाली आहे. पण दिलेले आयुष्य सुंदर आहे. फक्त स्वतःच्या मनात पाहिल्यानंतरच जमते आणि ते उमगते. जर आत्महत्या करण्याचा पर्याय सर्वांनी निवडला तर कसं होणार? संघर्ष तर चालूच राहणार आहे, पण स्वतःवर प्रेम केले तरच मार्ग सापडतील. स्वतःच स्वतःशी संघर्ष केला पाहिजे. घरातील तंटे, भांडणं, वाद हे होत राहणार, जिथे प्रेम आहे तिथे हे सर्व उद्भवणारच त्यामुळे कौटुंबिक जबाबदारीमुळे नाराज होऊन चालणार नाही.
आज लढाई स्वतःच्या मनाशी, आत्म्याशी आणि शरीराशी आहे. ती जिंकायची असेल तर प्रथम स्वतःला ओळखा, स्वतःचा स्वभाव ओळखा, त्याचा अभ्यास करा, स्वतःचे गुण ओळखा आणि त्या गुणांचा सदुपयोग करा, हीच एक अपेक्षा आणि हाच एक मार्ग असावा.
- ऋत्विज चव्हाण (लेखक सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)