मोहोळ तालुक्यातील अंकोली येथील इनोव्हेटिव्ह स्कूल तसेच शेज बाभूळगावच्या जि. प. शाळातील विद्यार्थ्यांनी शून्य सावली दिवसाचा अनुभव घेऊन त्या पाठीमागील विज्ञान शिक्षकांकडून समजून घेतले. शेज बाभूळगाव शाळेतील शिक्षक पैगंबर तांबोळी, इनोव्हेटिव्ह स्कूलचे मुख्याध्यापक रियाज तांबोळी यानी विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन केले.
गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी, खगोलतज्ज्ञ हेमंत मोने, विज्ञान ग्रामचे वैज्ञानिक अरुण देशपांडे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.
जिल्ह्यात नितीन पवार,शावरसिद्ध पाटील यांनी फुलचिंचोली, आचेगाव या ठिकाणी देखील हा उपक्रम राबवल्याचे तांबोळी यांनी सांगितले.
----
लॉकडाऊनमुळे घरीच असणारे विद्यार्थी, जिल्ह्यातील खगोलप्रेमी यांनी शून्य सावली दिवसाची खगोलीय घटना अनुभवली. सूर्याचे भासमान भ्रमण, पृथ्वीच्या आसाचे कलणे याचा अभ्यास यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी केला. मे महिन्यात शून्य सावली दिवसाचा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा ऑगस्ट महिन्यात हा अनुभव घेता येणार आहे.
- पैगंबर तांबोळी,
खगोल विज्ञान संवादक,अंकोली
----
अंकोली येथील इनोव्हेटिव्ह स्कूलमध्ये शून्य सावली दिनाचा अनुभव प्रात्यक्षिक द्वारे घेताना विद्यार्थी सोबत मार्गदर्शक शिक्षक रियाज तांबोळी.