सोलापूर : बॅकलॉग असणाºया विद्यार्थ्यांनाही पुढील वर्षात प्रवेश देण्यात येणार आहे; तर अंतिम वर्षातील अंतिम सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांची परीक्षेबाबतचा पुढील निर्णय आल्यानंतरच त्यावर चर्चा होणार आहे, अशी माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने देण्यात आलीÞपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विविध विद्यालयातील प्राचार्य, विविध संकुलांचे संचालक यांची बैठक बुधवारी आॅनलाईन पद्धतीने घेण्यात आली. ही बैठक कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यात जवळपास शंभरपेक्षा जास्त प्रमुखांची उपस्थिती होती.
या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. यात प्रामुख्याने अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत नुकतेच उच्च तंत्रशिक्षण मंत्र्यांनी यूजीसीला पत्र लिहीत अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचीही परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्याबाबतचे पत्र दिले आहे. यामुळे या पत्रावर निर्णय झाल्यानंतरच पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. याचबरोबर आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉग असायचे त्या विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश दिले जात नव्हते, पण अशा विद्यार्थ्यांनाही यंदा पुढील वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
परीक्षा पुढे ढकलली...- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सेट परीक्षा २८ जून रोजी होणार होती, ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. यासाठी सोलापुरात जवळपास १३ केंद्रे होती; पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. बी. घुटे यांनी दिली.- शासनाच्या आदेशानुसार अंतिम वर्ष सोडून इतर सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे, अशा विद्यार्थ्यांचे गुण जून अखेरपर्यंत महाविद्यालयांना पाठवण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. या विद्यार्थ्यांना आता अंतर्गत गुण आणि आतापर्यंतचा त्या विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स पाहून गुण देण्यात येणार आहे.
जून अखेरपर्यंत अंतिम वर्ष सोडून सर्व विद्यार्थ्यांचे गुण पाठवून त्यांचा निकाल लवकर लावण्याबाबत आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर पुढील निर्देश आल्यानंतरच अंतिम सेमिस्टरमधील विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत निर्णय होईल.- डॉ. मृणालिनी फडणवीसकुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ