आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १० : जगाला हादरवून सोडणाºया ‘ब्लू व्हेल’ गेमचा मुद्दा भारतातही चर्चेला आलेला असताना या गेमचे लोण आता सोलापुरातही पोहोचले आहे. सोलापुरातील एक अल्पवयीन मुलगा या गेमच्या आहारी जाऊन एकटाच पुण्याच्या दिशेने निघाला असताना पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातून आलेल्या एका संदेशाद्वारे त्याला भिगवण पोलिसांनी ताब्यात घेतले. सोलापुरातील जुळे सोलापूर परिसरात राहणाºया व्यावसायिकाचा १४ वर्षांचा मुलगा ‘ब्लू व्हेल’च्या आहारी गेल्याने या नादातच तो सोलापूरच्या बसस्थानकावरुन पुण्याच्या बसमध्ये बसून निघाला असल्याची माहिती पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातून भिगवण पोलिसांना गेली. तेथील सहायक पोलीस निरीक्षक नीलकंठ राठोड यांनी सकाळी १० च्या सुमारास भिगवण बसस्थानक गाठले. नियंत्रण कक्षातून आलेल्या माहितीनुसार त्यांनी बसची तपासणी केली असता संबंधित वर्णनाचा मुलगा मिळाला. त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून वडिलाचा फोन क्रमांक घेऊन कळविले. दुपारी एकच्या सुमारास वडील, चुलते अन्य नातलगांकडे त्याला सुपूर्द करण्यात आले. सोलापूरहून फोन आल्यामुळेच त्या मुलास ताब्यात घेता आल्याचे सपोनि राठोड यांनी सांगितले. -----------------काय आहे ब्लू व्हेल गेमब्लू व्हेल या गेममध्ये मुला-मुलींना सोशल मीडियावरून संपर्क करण्यात येतो. यात दररोज एक याप्रमाणे ५० दिवस काही काम करण्यास सांगितले जाते. शेवटच्या दिवशी या गेममध्ये सहभागींना आत्महत्या करण्याचे आवाहन गेमद्वारे केले जाते. जगभरात अनेक मुलांनी आत्महत्या केल्या आहेत.
सोलापुरातील विद्यार्थीही अडकला ‘ब्लू व्हेल’च्या जाळ्यात,पोलिसांची तत्परता: बसमधून मुलास ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 3:03 PM
सोलापूर दि १० : जगाला हादरवून सोडणाºया ‘ब्लू व्हेल’ गेमचा मुद्दा भारतातही चर्चेला आलेला असताना या गेमचे लोण आता सोलापुरातही पोहोचले आहे. सोलापुरातील एक अल्पवयीन मुलगा या गेमच्या आहारी जाऊन एकटाच पुण्याच्या दिशेने निघाला असताना पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातून आलेल्या एका संदेशाद्वारे त्याला भिगवण पोलिसांनी ताब्यात घेतले.
ठळक मुद्दे१४ वर्षांचा मुलगा ‘ब्लू व्हेल’च्या आहारी त्या मुलास ताब्यात घेता आल्याचे सपोनि राठोड यांनी सांगितले.