आॅनलाइन लोकमत सोलापूरसांगोला दि ६ : बारावी चा अभ्यासक्रम पेलत नसल्याच्या कारणावरुन विद्याथीर्नीने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील लोखंडी हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शनिवार ६ मे रोजी दु. १ च्या सुमारास चिकमहूद(ता.सांगोला)अंतर्गत ननवरे मळा येथे घडली आहे. प्रियांका अजीनाथ जाधव (वय १७ रा.चिकमहूद(ननवरे मळा)असे आत्महत्या केलेल्या विद्याथीर्नीचे नाव आहे. चिकमहूद येथील अजीनाथ जाधव यांची मुलगी प्रियांका ही माळशिरस (ता.पानीव) येथील श्रीराम शिक्षण संस्थेच्या विद्यालयातून अकरावी(शाखा शास्त्र)ची परीक्षा दिली होती. त्या परीक्षेत ती उत्तीर्णही झाली होती. दरम्यान कु.प्रियांका हीस बारावी शास्त्र शाखेचा अभ्यासक्रम पेलणार नसल्याचे सारखे वाटत होते. अभ्यासक्रम झेपत नसल्याने त्रस्त असल्याची चर्चा होती. दरम्यान सुट्टी निमित्त ती गावाकडे आली होती. शनिवार ६ मे रोजी दुपारी १ च्या सुमारास घरात कोणीही नसल्याचे पाहून तीने लोखंडी हुकाला ओढणीला गळफास घेवून आत्महत्या केली. चुलतीने कु.प्रियांका हीने गळफास घेतल्याचा आरडा-ओरड केल्याने हा प्रकार उघडकीस आला. पवन जालिंदर जाधव (रा.चिकमहूद) याने सांगोला पोलीसात खबर दिली असून तपास सपोनि नवनाथ गायकवाड करीत आहेत.
बारावीचा अभ्यासक्रम झेपत नसल्यामुळे विद्याथींनीची आत्महत्या, चिकमहुद (ता़ सांगोला) येथील घटना
By admin | Published: May 06, 2017 6:26 PM