नारायण चव्हाण
सोलापूर : राजकारणात अशक्य असं काहीच नसतं याचा अनुभव सध्या सोलापूरकरांना येतो आहे. एकमेकांविरोधात निवडणूक लढवलेले नेते जेव्हा एका व्यासपीठावर येतात आणि कानात हितगुज करतात तेव्हा वेगळी चर्चा झाल्याशिवाय राहत नाही.
भाजपचे खासदार डॉ़ जयसिद्धेश्वर महास्वामी हे या कार्यक्रमातून बाहेर पडले आणि दिलीप माने यांची एन्ट्री झाली. संयोजकांनी त्यांना सुभाष देशमुख यांच्या शेजारीच बसण्याचा आग्रह धरला, मग काय दोघांच्या गप्पा सुरु झाल्या. दोन्ही नेते एकत्र आल्याचे पाहून सर्वांनाच सलग दुसºयांदा धक्का बसला़ अधून-मधून संवाद साधत दिलखुलास हसत होते.
विशेष म्हणजे या कार्यक्रमात गतवेळच्या विधानसभा निवडणुकीतील सेनेचे उमेदवार गणेश वानकर, काँग्रेसचे दिलीप माने आणि भाजपचे सुभाष देशमुख हे एका व्यासपीठावर दिसले.
राजकारणात काहीही घडू शकते अशी चर्चागेल्या दोन दिवसांपासून सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि त्यांचे प्रतिस्पर्धी दिलीप माने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकाच वाहनातून गेल्याची चर्चा सोशल मीडियातून सुरू झाली़ हे दृश्य राजकीयदृष्ट्या वेगळे असले तरी राजकारणात कधीही काहीही घडू शकते, याचाच प्रत्यय देणारे आहे आज दुसºयांदा हे दोन्ही नेते एका राजकीय कार्यक्रमात एकत्र आले़