सोलापूर: सहकारमंत्री सुभाष देशमुख हे खोटी आकडेवारी देऊन दिशाभूल करणारे आहेत. दूध प्रकल्पासाठीच्या अनुदान गैरवापराची चौकशी करण्याची मागणी करीत सहकारमंत्र्यांबाबतच्या माझ्या तीन प्रश्नांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे द्यावीत मगच ऊस दराबाबत बोलावे. तसेच ते सहकारमंत्री नसून स्थगिती मंत्री आहेत, असाही आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक व खासदार राजू शेट्टी यांनी दिले आहे.
सहकारमंत्र्यांच्या मतदारसंघातील डोणगाव येथे आयोजित कार्यक्रमात शेट्टी बोलत होते. मागील वर्षी आम्ही लोकमंगल साखर कारखान्यासमोर आंदोलन केल्यानंतर एफआरपी अधिक ४०० रुपये देण्यात येईल असे गोड-गोड बोलले; मात्र हा शब्द पाळला नसल्याचा आरोप खा.शेट्टी यांनी केला. सहकारमंत्री कारखानदार आहेत की शेतकºयांचे सरकारमधील प्रतिनिधी आहेत हेच समजत नाही, कारण ते सातत्याने कारखानदारांचीच बाजू घेतात असा आरोप शेट्टी यांनी केला.
साखर आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हाधिकारी आरआरसीची कारवाई करीत असताना आणि आपल्या अधिकारात नसताना कारवाईला सहकारमंत्र्यांनी स्थगिती दिली?, शेतकºयांच्या नावावर स्वत:च्या कारखान्यासाठी कर्ज काढले मात्र भरले नाही?, दूध प्रकल्पासाठीच्या अनुदानाचा गैरवापर केला?, अशा सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना मंत्रिमंडळात ठेवणार का?, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे मगच ऊस दराबाबत बोलावे असे खा. शेट्टी म्हणाले.
कारखाना सुरू करण्याची गरज जेवढी शेतकºयांना आहे तेवढीच कारखानदारांनाही आहे. कारखानदार व शेतकºयांचे नाते चांगले असले पाहिजे; मात्र दराचा प्रश्न आला की आपण भूमिकेवर ठाम राहिले पाहिजे असे सांगत, मागील वर्षीचा हिशोब पहिला चुकता करा,
तरच धुराडे पेटवू देऊ कार्यक्रमाला अध्यक्ष प्रा. प्रकाश पोपळे, रविकांत तुपकर, महामूद पटेल, विजय रणदिवे, सिद्रामप्पा अबदुलपूरकर, उमाशंकर पाटील, पोपट साठे, उत्तम सुरवसे, नानासाहेब कोलते, फिरोज मनियार, सोमनाथ शेळके, शंकर आमले, बालाजी चराटे, बंडू चौगुले, हरिदास चौगुले, नानासाहेब आमले आदीसह शेतकरी उपस्थित होते.
कृषीमंत्र्यांना ‘हुमणी’ समजेना‘हुमणी’मुळे ऊस अडचणीत आला असल्याने एक शेतकरी कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटण्यासाठी गेला. ‘हुमणी’मुळे उसाचे नुकसान होत असल्याचे सांगितल्यानंतर हुमणी काय आहे?, असा प्रतिप्रश्न शेतकºयालाच केल्याचे खा. शेट्टी यांनी सांगितले. असे कृषीमंत्री असतील तर कशाची अपेक्षा करावी असेही ते म्हणाले.