सोलापूर : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या वार्षिक उत्पन्नात कमालीची घट झाली आहे . पाच वर्षांपूर्वी त्यांचे उत्पन्न २ कोटी ३७ लाखापर्यंत होते या आर्थिक वर्षात त्यांचे उत्पन्न एकदम २३ लाखांपर्यंत घसरले आहे . निवडणूक अजंर्सोबत सादर केलेल्या आयकर विवरणपत्रांतून ही बाब समोर आली आहे .
२०१४ साली सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ३१ मार्च २०१५ अखेर २ कोटी ३७ लाख ९६ हजार इतके वार्षिक उत्पन्न होते .त्यांच्या पत्नी स्मिता यांचे २४ लाख ३९ हजार होते . दुस?्या वर्षी त्यांच्या उत्पन्नात वाढही झाली मात्र मार्च २०१६ नंतर त्यात मोठी घट झालीय . यंदा सुभाष देशमुख यांचे वार्षिक उत्पन्न अवघे २३ लाख ७३ हजार रुपये तर पत्नी स्मिता यांचे ३१०० रुपये झाले आहे . --------हिंदू अविभक्त कुटुंबात मालमत्ता केली वर्गसुभाष देशमुख यांनी २०१६ नंतर हिंदू अविभक्त कुटुंब या सदराखाली आपली मालमत्ता वर्ग केल्याचे नमूद केले आहे .त्यामुळे या सदरात काही बँकांचे शेअर्स , स्थावर मालमत्ता ,सोने ,रोखड वर्ग करून स्वतंत्र बँक खातेही काढण्यात आले आहे .जवळपास १५कोटी ९२ लाखांची जंगम आणि स्थावर मालमतेचा त्यात समावेश आहे . या हिंदू अविभक्त कुटुंबावर ९ कोटी ३२ लाखाचे कर्जही आहे.