सोलापूर - बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संवरक्षण, विनयभंग, मारहाण असे गंभीर गुन्हे दाखल असलेला जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार सुबजित लक्ष्मण कांबळे ( वय २५, रा. मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर, न्यु बुधवार पेठ) याला शनिवार १७ सप्टेंबर पासून दोन वर्षांसाठी सोलापूर जिल्ह्यासह तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
आरोपी कांबळे याच्यावर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा, विनयभंग, मारहाण तसेच शारीरिक व मालाविषयी चार गंभीर गुन्हे दाखल झाले होते. यासाठी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई चक्रधर ताकभाते यांनी तडीपार बाबत अहवाल पाठवला.
पोलीस उपआयुक्तांनी सुबजित कांबळे याला सोलापूर शहर-जिल्हा, पुणे जिल्हयातील इंदापूर तालुका व उस्मानाबाद जिल्हा येथून दोन वर्ष कालावधी करीता तडीपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राजेंद्र माने, उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. संतोष गायकवाड, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक चक्रधर ताकभाते पथकाने केली.