अकलूज : ऑक्टोबर २०२० मध्ये एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाने घेतलेल्या बी.एस्सी. गृहविज्ञान अंतिम वर्षाच्या परीक्षेत रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील गृहविज्ञान महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनाली लोंढे हिने विद्यापीठ गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक पटकाविला.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील, महाविद्यालय विकास समितीच्या सभापती स्वरूपाराणी मोहिते-पाटील, सचिव अभिजित रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील, प्राचार्य डॉ. राहुल सुर्वे यांनी सोनाली लोंढे हिचे कौतुक केले.
बी. एस्सी. भाग १ मध्ये शिवानी कदम हिने ८७.५० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. स्वरूपा जाधव हिने ८५.९० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तर सायमा शेख हिने ८३.२० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. बी.एस्सी. भाग २ मध्ये बतूल तांबोळी हिने ८६.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. माधुरी निंबाळकर हिने ८६.६० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तर अलका म्हस्के हिने ८५.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. बी.एस्सी. भाग ३ मध्ये सोनाली लोंढे हिने ८६.८० टक्के गुण मिळवून विद्यापीठात पाचवा व महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला. पौर्णिमा जाधव हिने ८४.४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक, तर तेजश्री गोडसे हिने ८४ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.