कासेगाव : कासेगाव (ता. पंढरपूर) येथील अभयसिंह बाळासाहेब देशमुख हा केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत तिसºयांदा उत्तीर्ण झाला आहे. तो देशात १५१ व्या रँकने उत्तीर्ण झाला आहे. कोणताही क्लास न लावता त्याने हे घवघवीत यश मिळवले आहे. पहिले दोन प्रयत्न अयशस्वी ठरले; मात्र तिसºयावेळी त्यांनी हनुमान उडी घेत गावाचं नाव उज्ज्वल केलं.
अभयसिंह सध्या मुंबई येथे असिस्टंट रजिस्टर आॅफ कंपनीज (आरओसी) म्हणून कार्यरत आहे. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण इंग्लिश मीडियम स्कूल मनीषानगर, उच्च माध्यमिक शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथे झाले. कॉलेज आॅफ इंजिनियरिंग (सिव्हिल) पुणे येथून त्यांनी डिग्रीचे शिक्षण पूर्ण केले.
कासेगाव (ता. पंढरपूर) चे पहिले क्लास वन अधिकारी होण्याचा मान त्यांनी मिळविला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सलग तिसºयांदा उत्तीर्ण होऊन शेतकरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर त्याने नवा आदर्श समोर ठेवला आहे. त्याच्या या यशामुळे कासेगाव पंचक्रोशीतून त्याचे कौतुक होत आहे.कोणताही क्लास न लावता फक्त टेस्ट सीरिजच्या माध्यमातून अभ्यास केला. पुणे येथील सदाशिव पेठेत माझ्या फ्लॅटवर आम्ही किमान पाच मित्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करीत होतो. मला अभिमान आहे की, ते पाचही माझे रूम पार्टनर आयएएसमध्ये सिलेक्ट झाले आहे. अभ्यासात सातत्य ठेवल्यामुळे मी सलग तीन वेळा यश संपादन करू शकलो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जास्त बाऊ न करता योग्य नियोजन करून अभ्यास केल्यास निश्चित यश मिळते.- अभयसिंह देशमुखअसिस्टंट रजिस्टर आॅफ कंपनीज (आरओसी) मुंबई.