शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

गाळप सुरू असलेले सोलापूर जिल्ह्यातील कारखाने साखर आयुक्तांच्या दप्तरी बंदच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 10:50 AM

सहकारमंत्र्यांच्या दोन्ही कारखान्यांचा समावेश; ३१ कारखाने सुरू; केवळ २५ कारखान्यांचीच नोंद

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील जवळपास ३१ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरूसाखर आयुक्तांच्या दप्तरी २५ कारखान्यांचेच गाळप सुरू झाल्याची नोंद सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे दोन्हीही कारखाने अद्यापी सुरू झाले नसल्याचे साखर आयुक्तांच्या दप्तरावरुन स्पष्ट होते

सोलापूर:  जिल्ह्यातील जवळपास ३१ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू असला तरी साखर आयुक्तांच्या दप्तरी २५ कारखान्यांचेच गाळप सुरू झाल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे दोन्हीही कारखाने अद्यापी सुरू झाले नसल्याचे साखर आयुक्तांच्या दप्तरावरुन स्पष्ट होते.

राज्यात सर्वाधिक ३९ साखर कारखाने असलेला सोलापूर जिल्हा सध्या दुष्काळामध्ये अडकला आहे. या जिल्ह्यातील ३९ पैकी २५ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्याचे साखर आयुक्त कार्यालयाच्या २५ नोव्हेंबरच्या माहितीवरुन दिसून येते. सुरू असलेल्या २५ साखर कारखान्यांचे २५ नोव्हेंबरपर्यंत ३२ लाख ९० हजार ९२३ मे.टन इतके गाळप झाले आहे. राज्यात अन्य जिल्ह्याच्या तुलनेत हे गाळप उच्चांकी आहे.

झालेल्या गाळपातून ३० लाख ४१ हजार ३२० क्विंटल साखर तयार झाली असून उतारा सरासरी ९.२४ इतका पडला आहे. गाळप सुरू  असलेल्या २४ कारखान्यांमध्ये सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, विठ्ठल गुरसाळे, भीमा टाकळी सिकंदर,  पांडुरंग श्रीपूर, संत दामाजी,  मंगळवेढा, आदिनाथ करमाळा, सहकार शिरोमणी वसंतदादा काळे, विठ्ठलराव शिंदे, माढा, कूर्मदास, माढा, लोकनेते बाबुरावआण्णा  पाटील शुगर, सासवड माळी शुगर, विठ्ठल कॉर्पोरेशन म्हैसगाव, सिद्धनाथ शुगर तिºहे, जकराया वटवटे,भैरवनाथ शुगर विहाळ, इंद्रेश्वर शुगर, बार्शी, सीताराम महाराज खर्डी,फॅबटेक शुगर, नंदूर, युटोपियन शुगर, कचरेवाडी, भैरवनाथ लवंगी, भैरवनाथ आलेगाव, जयहिंद शुगर, आचेगाव, बबनराव शिंदे शुगर्स, गोकुळ माऊली,  विठ्ठल रिफायनरी, करमाळा आदींचा समावेश आहे.

 साखर आयुक्तांकडे अद्यापही कारखाने सुरू नसल्याची  नोंद असलेल्यामध्ये सिद्धेश्वर, कुमठे, मकाई भिलारवाडी, करमाळा, लोकमंगल अ‍ॅग्रो, बीबीदारफळ, लोकमंगल शुगर, भंडारकवठे,  मातोश्री लक्ष्मी शुगर,  गोकुळ शुगर या सहा कारखान्यांचा समावेश असला तरी हे कारखाने सुरू असल्याचे सांगण्यात आले. मागील दोन, तीन व त्यापेक्षा अधिक वर्षांपासून शंकर सहकारी, संतनाथ वैराग, सांगोला सहकारी, स्वामी समर्थ अक्कलकोट, आर्यन बार्शी, शेतकरी चांदापुरी, लोकशक्ती, शिवरत्न उद्योग, करकंब  हे आठ कारखाने बंद आहेत. 

विठ्ठलराव शिंदे राज्यात प्रथममाढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे गाळप राज्यात सर्वाधिक म्हणजे ४ लाख ६२ हजार ७०६ मे.टन. इतके झाले असून ४ लाख ५४ हजार ६५० क्विंटल साखर तयार झाली आहे. गाळपात विठ्ठलराव शिंदे राज्यात प्रथम तर १०.२६ उतारा घेऊन श्रीपूरचा पांडुरंग  कारखाना राज्यात प्रथम आहे. 

गाळप परवाना काहींना मिळाला नसताना सुरू असलेल्या कारखान्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.  काहींना परवाना देण्याची प्रक्रिया सुरू आहे. गाळप सुरू असूनही नोंद नसलेल्या कारखान्याबाबत साखर आयुक्तांशी चर्चा करतो.-डॉ. संजय भोसले, प्रादेशिक सहसंचालक 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेPuneपुणेSubhash Deshmukhसुभाष देशमुख