अरुण बारसकर सोलापूर: ऊस तोडणी मजुरांचा संप त्यातच पक्ष पंधरवड्याच्या अडथळ्यामुळे एक आॅक्टोबरपासून साखर हंगाम सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. याशिवाय हंगाम सुरू करण्याची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीची तारीखही निश्चित केलेली नाही.
राज्यात मागील वर्षीपेक्षा यावर्षी उसाचे क्षेत्र अधिक आहे. ऊस गाळप हंगामाचे नियोजन करण्यासाठी मागील महिन्यात सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी साखर संकुलात एक बैठक घेतली होती. या बैठकीनंतर सहकारमंत्र्यांनी एक आॅक्टोबरला हंगाम सुरू करण्याबाबत सांगितले होते. ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणात असले तरी ऊस तोडणी मजूर संघटनेने तोडणी-वाहतूक दर वाढविण्याच्या मागणीसाठी संप पुकारला आहे.
सध्याच्या दराच्या कराराची मुदत पुढीलवर्षी संपणार असली तरी पुढील वर्षी निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याने ऊस तोडणी मजूर संघटनेच्या नेत्यांनी संप जाहीर केला आहे. त्यातच २४ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर हा पक्ष पंधरवडा कालावधी आहे. पक्ष पंधरवडा हा कालावधी अशुभ समजला जात असल्याने अनेक कारखानदार केवळ मोळी टाकून ठेवण्याची शक्यता आहे. १८ आॅक्टोबर रोजी विजयादशमीचा सण असून या दिवशी भगवान गडावर होणाºया मेळाव्याला बराचसा मजूरवर्ग उपस्थित असतो.
मंत्री समितीची बैठक महत्त्वाचीच्राज्यातील मागील साखर हंगामातील शेतकºयांचे एफआरपीनुसार देणे,ऊस तोडणी मजुरांचे देणेबाकी तसेच पुढील हंगामात येणाºया अडचणींवर मंत्री समिती बैठकीत चर्चा होऊन मुख्यमंत्री निर्णय घेतात. मागील वर्षीच्या व अगोदरच्या हंगामाची एफआरपी आजही अनेक कारखाने देत नाहीत. त्यामुळे मंत्री समितीची बैठक तितकीच महत्त्वाची आहे.
साखर कारखान्याकडून १ आॅक्टोबरपासून कारखाने सुरू करण्याची मागणी आहे. त्यानुसार चर्चा करण्यात आली होती; मात्र अद्याप मंत्री समितीची बैठक झाली नाही. आॅक्टोबरमध्ये कारखाने सुरू होतील.- सुभाष देशमुख, सहकार व पणनमंत्री
जिल्ह्यात दुष्काळी स्थिती असल्याने ऊस वेळेवर तोडला नाही तर शेतकºयांचे नुकसान होणार आहे. आम्ही ३० तारखेला मोळी टाकून ठेवणार आहोत.राजन पाटील, लोकनेते शुगर, अनगर
तोडणी-वाहतूक मजुरीत वाढ करण्याची आमची मागणी आहे. पंकजाताई मुंडे यांच्याशी चर्चा झाली असून दसºयाला निर्णय होण्याची शक्यता आहे.-काशिनाथ दराडे ऊस तोडणी मुकादम, बीड