शिवानंद फुलारी अक्कलकोट : तालुक्यातील मैंदर्गी येथील प्रा. तोटप्पा हसरमनी यांनी पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत दुष्काळावर मात करत सेंद्रिय शेतीचा अवलंब केला आहे. पाच एकरावर एक डोळा उसाची लागवड केली आहे. त्याला सध्या २८ कांड्या आहेत. बांबूसारख्या पिकलेल्या उसाचे गुºहाळ करून ‘गुºहाळ घर’ ते बनविणार आहेत. गुळाला जागतिक बाजारपेठेत चांगला भाव असल्याने तिकडे गूळ पाठविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.
पुण्यात नोकरी असली तरी प्रा. हसरमनी यांची वडिलोपार्जित जमीन मैंदर्गी येथे आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने सेंद्रिय शेतीचे स्वप्न पाहून त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बोअरच्या माध्यमातून पाच एकरमध्ये एक कांडी उसाची लागवड केली आहे. त्याला ठिबकद्वारे पाणी देण्यात येत असून, पूर्णपणे रासायनिक मात्रांचा वापर टाळून ते सेंद्रिय पद्धतीने ऊस वाढवत आहेत. दहा महिन्यांच्या कालावधीतच २८ कांड्यांचा ऊस आहे.
बारा महिन्यांनंतर सेंद्रिय गूळ तयार करून देशातील मल्टी शहरासह, विदेशात विक्री करण्यासाठी सध्या गूळ घर ते तयार करीत आहेत. त्यांना सांगलीचे कृषीभूषण संजीव माने, डॉ. प्रा. विशाल सरदेशमुख, डॉ. होलमुखे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. तोटप्पा हसरमनी यांना या कामासाठी अभियंत्या असलेल्या त्यांच्या पत्नी शिवलीला हसरमनी, त्यांच्या आई शिवलिंगाव्वा हसरमनी यांची मदत मिळत आहे. ते विद्युत अभियांत्रिकीचे पदवीधर असले तरी कृषी क्षेत्रातून ते पीएच. डी करीत आहेत.
खत, पाणी व्यवस्थापन...च्ऊस लागवड करण्याआधी तागाची लागवड करून रोटरने त्याला जमिनीत गाढण्यात आले. भरणीवेळी कोंबडी खत, निंबोणी पेंड, मायक्रोन ड्रीयन्स सूक्ष्मजीव वायूचाही वापर खत फवारणीत करण्यात आला. बीज लागवडीपूर्वी २०० लिटर पाण्यामध्ये बियाणे बुडवून लागवड केली. नत्र, स्फूरद, पालाश याचाही वापर करण्यात आला. खत याचे स्थिरीकरण आले.यामुळे हुमणी,मावा,करपा या रोगापासून संरक्षण मिळते. तण महिला मजुरांच्या माध्यमातून काढण्यात आले. त्यात आंतरपीक म्हणून कावेरी वाणाच्या गव्हाची पेरणी करण्यात आली. दहा क्विंटल गव्हाचे उत्पन्नही त्यांना मिळाले आहे.
सध्या देशाला विषमुक्त सेंद्रिय शेतीची गरज आहे. नोकरी करण्यापेक्षा शेती आता महत्त्वाची बनत असून, नवनवीन प्रयोग व कमी पाण्यावर शेती यशस्वी होत आहे. भविष्यात सोलवर शेती, विदेशी मार्केट विकसित करण्याचा माझा मानस आहे.-प्रा. तोटप्पा हसरमनी