सोलापूर: सोलापूर जिल्हा तसा साखरपट्टा म्हणून सबंध महाराष्टÑामध्ये ओळखला जातो. जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या ३९ असलीतरी प्रत्यक्षात १५ कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु केला आहे. सुरु झालेले कारखानेही पूर्ण क्षमतेने अद्याप सुरु नाहीत. याचे कारण म्हणजे अपुरी तोडणी वाहतूक यंत्रणा व ऊस क्षेत्राचा न आलेला अंदाज. यामुळे ज्या शेतकºयांच्या उसाची लागण नोंद संपत आली तरी ऊस जाईना म्हणून तुरे येऊन वजन घटणे, उंदीर, घुशींचं संकट ओढावू लागलं आहे. यंदा ऊस क्षेत्र कमी असल्याने लवकर ऊस जाईल, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या ऊस उत्पादकांमधून यंदाही भ्रमनिरास झाल्याचा सूर उमटू लागला आहे.
तोकडी यंत्रणा; ऊस वेळेवर जाईनाअक्कलकोट तालुक्याच्या कार्यक्षेत्रात चारपैकी दोन कारखाने सुरू आहेत. यावर्षी तोकडी यंत्रणा असल्यामुळे वेळेवर ऊस गाळपासाठी जाताना दिसत नाही. परिणामी शेतकºयांमधून नाराजी व्यक्त होत आहे. कार्यक्षेत्रात ११ हजार हेक्टर ऊस असल्याची नोंद कागदोपत्री असली तरी उसाची म्हणावी तशी वाढ झालेली नाही. यामुळे उत्पन्न पन्नास टक्क्याने घटले आहे.
अक्कलकोट तालुक्याच्या कार्यक्षेत्रात मातोश्री शुगर, रुद्देवाडी, गोकुळ माऊली, तडवळ, जयहिंद,आचेगाव, स्वामी समर्थ, दहिटणे असे चार साखर कारखाने आहेत. त्यापैकी स्वामी समर्थ व गोकुळ वगळता उर्वरित दोन्ही कारखाने मागील १५ ते २५ दिवसांपासून सुरू आहेत. यंदा उसाचे क्षेत्र कमी असूनसुद्धा वेळेवर ऊस उचलला जात नसल्याचे गाºहाणे ऊस उत्पादक शेतकºयांमधून मांडले जाऊ लागले आहे. याचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला असता दरवर्षाच्या तुलनेत पन्नास टक्केसुद्धा यंत्रणा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. याची कारणेही अनेक आहेत.
एकंदरीत चार पैकी तालुक्यात दोनच कारखाने चालू असून केवळ ४०० वाहने कार्यरत आहेत. दोन बंद असलेल्या कारखान्यांपैकी एक शेतकरी ऊसबिलाअभावी तर एकावर प्रशासक आहे. ऊस घेऊन जाण्यासाठी उशीर होत असल्यामुळे सर्वत्र उसाचे तुरे वाढले आहेत. यामुळे वजन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ऊस क्षेत्र घटले तरी शेतकºयांची धावपळ सुरुचमोहोळ : गेली तीन वर्षे पावसाअभावी सातत्याने दुष्काळाच्या छायेत असणाºया मोहोळ तालुक्यातील उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुळे तालुक्यातील ३ साखर कारखान्यांपैकी केवळ एक कारखाना सुरू आहे. ऊस क्षेत्र घटल्यामुळे ऊसतोड लवकर होईल अशा अपेक्षेत असलेल्या शेतकºयांची धावपळ सुरुच आहे.
मोहोळ तालुक्यात केवळ उजनीच्या भरवशावर गेल्या दहा ते पंधरा वर्षांत बळीराजा रब्बी व खरीप पिकापेक्षा ऊस शेतीकडे मोठ्या प्रमाणात वळला आहे. त्यामुळे तालुक्याच्या सीमेवर चार साखर कारखाने असताना तालुक्यातील हक्काचे तीन कारखाने निर्माण झाले. तीन वर्षांत पावसाचे प्रमाण कमी झाल्याने उसाचे क्षेत्र घटले. चालूवर्षी उजनी पाण्यासह पावसाने पाठ फिरवल्याने बहुतांश शेतकºयांनी ऊस लावलाच नाही. आजमितीला तालुक्यात केवळ ५ हजार ८५३ हेक्टर एवढाच ऊस शिल्लक आहे त्यामुळे कारखान्याला नोंदवलेल्या उसाचे प्रमाण कमालीचे घटले आहे.
चालू हंगामासाठी अनगर येथील लोकनेते साखर कारखान्यावर केवळ १ लाख ४ हजार टन उसाची नोंद झाली होती. तोडणी, वाहतूक खर्च व नोंद खूपच कमी झाल्याने कारखाना चालू करणे परवडत नाही म्हणून कारखाना बंद ठेवण्याचा निर्णय घेत नोंदविलेला ऊस विठ्ठलराव शिंदे व जयहिंद शुगर या दोन कारखान्याला देण्याचा निर्णय घेतला आहे.
जकराया साखर कारखान्यात ७ हजार हेक्टर उसाची नोंद आहे. दररोज ३ हजार ५०० मे.टन क्षमतेने गाळप सुरु आहे. ज्या शेतकºयांची अडचण आहे. अशा सर्वांचा ऊस गाळप करण्यास मदत करु, असे कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी सांगितले.एकंदरीत चालू वर्षी उसाचे कमी झालेले प्रमाण, त्यात कारखाने बंद यामुळे अडचणीतून मार्ग काढत शेती करणाºया बळीराजाला पुन्हा अडचणीत येण्याचीच वेळ आली आहे.