अरुण बारसकरसोलापूर: यंदा ऊस गाळपात कोल्हापूर जिल्ह्याला अहमदनगर जिल्ह्याने मागे टाकले असून, आजही तीन साखर कारखाने सुरू असताना एक कोटी ३६ लाख ९० हजार ४८ मे. टन गाळप झाले आहे. सोलापूर जिल्हा मात्र पहिल्या क्रमांकावरच आहे.राज्यात यावर्षी साखर हंगाम सुरू केलेल्या १८७ कारखान्यांपैकी सोमवारपर्यंत १८१ कारखान्यांचा पट्टा पडला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील तीन, पुणे जिल्ह्यातील दोन व औरंगाबाद विभागातील एका कारखाना सुरू असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.
यावर्षी सोलापूर जिल्हा ऊस गाळपात राज्यात प्रथम क्रमांकावर असून, मागील महिन्यापर्यंत दुसºया क्रमांकावर कोल्हापूर जिल्हा होता. कोल्हापूर जिल्ह्यातील सुरू झालेले सर्वच २२ कारखाने १० एप्रिलपर्यंत बंद झाले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे एकूण गाळप एक कोटी ३३ लाख ६३ हजार ८९६ मे. टन झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातीलही २२ कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. त्यापैकी १९ कारखाने बंद झाले असून, उर्वरित तीन कारखाने सुरू आहेत.
या कारखान्यांनी सोमवारपर्यंत एक कोटी ३६ लाख ९० हजार ४८ मे. टन गाळप केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढल्याचा हा परिणाम असून, गाळपात कोल्हापूर जिल्ह्याला मागे टाकले आहे. सोलापूर जिल्हा मात्र राज्यात प्रथम क्रमांकावरच असून, सोलापूर जिल्ह्यातील ३० साखर कारखान्यांनी एक कोटी ६९ लाख ३५ हजार ४९६ मे. टन ऊस गाळप केले असून, एक कोटी ७९ लाख १७ हजार ७३३ क्विंटल साखर तयार झाली आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटल्याने सोलापूरचे गाळप अवघे ३६ लाख मे. टन इतकेच झाले होते.
चार कारखान्यांचा उतारा कमीच...- सोलापूर जिल्ह्यातील गाळप घेतलेल्या ३० कारखान्यांपैकी २६ कारखान्यांचा साखर उतारा १० टक्क्यांपेक्षा अधिक असून, सिद्धेश्वर, सिद्धनाथ, भैरवनाथ विहाळ व भैरवनाथ लवंगी या कारखान्यांचा अंतिम साखर उतारा १० टक्क्यांपेक्षा कमी आहे. या उताºयाचा परिणाम पुढील वर्षी एफ.आर.पी.प्रमाणे शेतकºयांना दर देण्यावर होणार आहे. गाळपात आघाडीवर असलेल्या सोलापूर जिल्ह्याचा साखर उतारा कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे ऊसाचा दरावर परिणाम होणार आहे.
यंदा दुपटीहून अधिक गाळप- राज्याचे गाळप ९ कोटी ५१ लाख ५३ हजार इतके झाले असून, १० कोटी ७० लाख ८० हजार क्विंटल साखर तयार झाली आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी दुपटीहून अधिक गाळप झाले आहे. साखरही त्याच पटीत तयार झाली आहे.