शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
3
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
4
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
5
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
6
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
7
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
8
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
9
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
10
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
11
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
12
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
13
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
14
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
17
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
18
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
19
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
20
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

ऊस वाहतूकदारांना मुकादमांकडून गंडा

By admin | Published: December 18, 2014 10:05 PM

मजूर आलेच नाहीत : सुमारे ५0 ते ६0 कोटींचा फटका

प्रकाश पाटील - कोपार्डे --साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी झाला आहे. बहुतांश ऊस वाहतूक करणारे वाहनमालक मजूर बीड, उस्मानाबाद लातूर, जत, बार्शी या भागातून आणतात. यासाठी या ऊसतोड मजुरांना वाहनमालकांना मोठ्या प्रमाणात रक्कम अ‍ॅडव्हान्स म्हणून द्यावी लागते; पण अलीकडच्या काळात या ऊसतोड मजुरांकडून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.यावर्षी तर जिल्ह्यातील कारखान्यांना ऊसवाहतूक करणाऱ्या वाहनमालकांकडून लाखोंची उचल करूनही किमान १२५ ते १५० ऊसतोड मजूर टोळ्या न आल्याने ५० ते ६० कोटींचा वाहनमालकांना गंडा बसला आहे.यावर्षी ऊसदर आंदोलनाची तीव्रता कमी झाल्याने साखर कारखान्यांचे गाळप हंगाम नोव्हेंबरमध्येच सुरू झाले आहेत. जिल्ह्यात ऊस वाहतूक व तोडणीची एक पद्धत तयार आहे. यानुसार ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनमालकांना ऊसतोड मजुरांच्या टोळ्या करण्यासाठी अ‍ॅडव्हान्स दिली जाते. वाहनमालक ती घेऊन ऊसतोड मजूर पुरवठा करणाऱ्या मुकादमाला देतात. हा अ‍ॅडव्हान्स मुकादम सर्वसाधारण आॅगस्ट महिन्यात ऊसतोड मजुरांना पैसे देण्यासाठी घेत असतो. यावेळी कारखाने ज्या वाहनमालकाला हे पैसे अ‍ॅडव्हान्स द्यावयाचे आहे, त्यांच्याबरोबर करार करतात. त्यासाठी किमान चार मोठे शेतकरी जामीन घेतले जातात. त्यामुळे कारखान्यांच्या पैशाला हमी राहते. मात्र, वाहनमालक ज्या मुकादमाला अ‍ॅडव्हान्स म्हणून पैसे देतात. त्यांच्याकडून कोणतीच हमी न घेता केवळ विश्वासावर ८ ते १० लाख रुपये दिले जातात. मात्र, अलीकडे या मुकादमांकडून मोठ्या प्रमाणात विश्वासघात होत असून, पैसे उचलायचे मात्र ऊसतोड मजूर पुरवायचेच नाहीत, असा प्रकार सुरू आहे. त्यामुळे वाहनमालकाचे वाहन एक तर बंद करून उभे ठेवावे लागते. त्याशिवाय ८ ते १० लाख रुपये मजुरांना देण्यासाठी हकनाक बुडाल्याने व त्याला वाहनमालकालाच जबाबदार धरले जाते. एवढ्या मोठ्या रकमेची भरपाई करायची कोठून हा यक्षपश्न या वाहनमालकांसमोर आहे. त्याशिवाय या रकमेला व्याज आकारले जाते ते वेगळेच. यामुळे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनमालकांच्यापुढे आत्महत्येशिवाय पर्यायच उरलेला नाही.१० ते १५ लाखांचे वाहन, ऊसतोड मजुरांसाठी एक टोळीला १० ते १२ लाखांचा अ‍ॅडव्हान्स देणे. डिझेलचे वाढलेले दर व कामापेक्षा मजुरांकडून होणारी जादा ऊचल यामुळे ऊस वाहतूक वाहन मालक म्हणजे व्याजात पिसणी झाले आहे. एवढे करूनही संपूर्ण हंगामात ५० ते ६० हजारांचे वाहन मालकांकडे शिल्लक राहते. त्यापेक्षा ५० रुपयांचा कोयता घेऊन ऊसतोड केल्यास किमान हंगामात ५० ते ६० हजारांचा धंदा होतो. त्याशिवाय जनावरांना वैरण मिळून शेतीची कामेही पाहता येतात. - विजय पाटील, वाहन मालक, कुडित्रे, ऊसतोड मजुरांची पटपडताळणी घोषणा हवेतचभाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी या प्रकरणातील दाहकता अनुभवली होती. यासाठी त्यानां स्वत: माजी कृषिमंत्री शरद पवार यांना शाळा पट पडताळणी प्रमाणे ऊसतोड मजुरांचीही पटपडताळणी करण्याची यंत्रणा निर्माण करावी, अशी विनंती केल्यानंतर सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व कृषिमंत्री बाळासाहेब विखे-पाटील यांनी २०११-१२ मध्ये ऊसतोड मजुरांची पटपडताळणी करण्याची घोषणा केली होती; पण ती हवेतच विरली.हंगाम सुरुवातील मराठवाड्यात ऊसतोड मजूर मुकादमांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. वाहनमालकांच्यावतीने त्यांना विनंती केली, तरीही १५ ते २० टोळ्या आलेल्या नाहीत. त्यामुळे वाहनमालक, कारखाना यांचे नुकसान होत आहे. ही परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच कारखान्यात आहे.- सुरेश अपराध, शेती अधिकारी, कुंभी-कासारीजिल्ह्यातील किमान १२५ ते १५० मजूर टोळ्या ऊसतोडीसाठी आल्याच नाहीतएकेका वाहनमालकांच्याकडून १० ते १२ लाख रुपये ऊसतोड मजुरांची उचल५० ते ६० कोटी रुपये उचल करून ऊसतोड मजूर आलेच नाहीत