शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

आत्महत्या हा शेवटचा पर्याय नव्हे! चला..‘निराशेकडून आशेकडे’ अनुभव घेऊ या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 3:12 PM

लोकमत अन् स्पार्कचा उपक्रम: रविवारी मानसोपचार तज्ज्ञ करणार परिसंवादातून समुपदेशन

ठळक मुद्देरविवारी सायंकाळी ‘सुसाईड इज प्रिव्हेंटेबल’ या नाटिकेने या कार्यक्रमाची सुरुवात होईल डॉ. स्वाती कोरके ‘विवेकनिष्ठ विचारपद्धती व व्यसनमुक्ती’ यावर मार्गदर्शन करणार आहेतसंतोष ऐदाळे हे ‘नोकरीतील ताणतणाव’ विषयातून सद्यस्थिती मांडतील

सोलापूर: हल्ली सर्वच वयोगटात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. निराशेच्या गर्तेत अडकलेल्या अशांना आपण रोखलं पाहिजे, रोखू शकतो, आत्महत्या हा शेवटचा पर्याय नव्हे या जाणिवेतून लोकमत अन् सोलापूर सायकॉलॉजिस्ट असोसिएशन अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या (स्पार्क) संयुक्त विद्यमाने ‘निराशेतून आशेकडे’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. रविवारी ९ जून रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत समाजकल्याण केंद्र, रंगभवन शेजारी, सोलापूर येथे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

आयुष्याच्या विविध टप्प्यावर अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. साधारणत: दहा वर्षांनंतरच्या काळात वेगवेगळ्या कारणांमुळे ताण, निराशा, राग, भीती असे मानसिक त्रास होऊ लागतात. काही ताण झेलण्यापलीकडे गेलेतर त्याचे रुपांतर निराशेत होते आणि यातून आत्महत्येसारखे विचार येतात. हे टाळण्यासासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती स्पार्क संस्थेच्या अध्यक्षा अलका काकडे यांनी दिली. 

रविवारी सायंकाळी ‘सुसाईड इज प्रिव्हेंटेबल’ या नाटिकेने या कार्यक्रमाची सुरुवात होईल. यानंतर परिसंवाद आयोजित केला आहे. यात स्पार्कच्या प्रमुख अलका काकडे ‘निराशेतून आशेकडे जाताना’ या विषयातून उपस्थितांशी संवाद साधतील. यानंतर डॉ. पद्मजा गांधी ‘आत्महत्येची कारणे, लक्षणे व उपाय’ यावर आपली मांडणी करतील. डॉ. स्वाती कोरके ‘विवेकनिष्ठ विचारपद्धती व व्यसनमुक्ती’ यावर मार्गदर्शन करणार आहेत. संतोष ऐदाळे हे ‘नोकरीतील ताणतणाव’ विषयातून सद्यस्थिती मांडतील. 

कार्यक्रमानंतर प्रश्नोत्तराच्या माध्यमातून तज्ज्ञ मान्यवर उपस्थितांचे शंका-समाधान करतील. कार्यक्रमस्थळी आत्महत्येपासून परावृत्त करण्याच्या दृष्टीने प्रबोधनात्मक पोस्टर प्रदर्शनही मांडले जाणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन आणि सूत्रसंचालनाची बाजू मृणालिनी मोरे आणि मयूर भंडारे सांभाळणार आहेत. या कार्यक्रमास सोलापूरकरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

सामाजिक जाणिवेसाठी ‘लोकमत’चा पुढाकार- वैयक्तिक आणि सामाजिक स्वास्थ्य चांगले रहावे या जाणिवेतून सोलापुरातील काही मानसशास्त्रीय समुपदेशकांनी एकत्र येऊन स्पार्क सोलापुरात सायकॉलॉजिस्ट असोसिएशन अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर सुरु केले आहे. दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल लागताच मुलांमध्ये आत्महत्यांसारखे विचार येतात. निराशेचा सूर उमटतो. तो टाळला जावा, समाजातील विविध घटकांमधूनही असे प्रकार घडू नयेत यासाठी ‘लोकमत’ने स्पार्क सोबत सामाजिक जाणिवेतून हे पाऊल उचलले आहे. वाचकांना जगाच्या घडामोडींची माहिती देण्याबरोबरच आत्महत्यांसारख्या गंभीर विषयावर मंथन होऊन सकारात्मक विचार लोकांमध्ये पेरला जावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स