आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर : शहरातील सातरस्ता येथील शासकीय विश्रामगृहातील पहिल्या मजल्यावरील जास्वंदी कक्ष (क्रमांक १४) मध्ये भानुदास सोपान शिंदे (वय ५९,रा. जुळे सोलापूर ) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी यमाईदेवी आश्रमशाळेच्या संस्थाचालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. फिर्यादी युवराज शिंदे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आश्रमशाळेच्या पदाधिकाºयांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबात मयत भानुदास शिंदे यांनी आवाज उठविल्याने तो राग मनात धरून भानुदास यांच्या पत्नीला त्रास देण्यास सुरुवात केली. फिर्यादीची आई निशा शिंदे या १९९९ पासून संस्थेत स्वयंपाकी या पदावर त्यांची नेमणूक होती. सार्वजनिक बांधकाम विभागात मयत भानुदास कामाला होते. ते २०१६ रोजी सेवानिवृत्त झाले.तसेच ते संस्थेत संचालक होते. शाळेकडून फिर्यादीच्या आईचा पगारही थांबवला. त्याकरिता मयत भानुदास आणि त्यांची पत्नी या दोघांनी झालेल्या अन्यायाविरुद्ध जिल्हा परिषद व मंत्रालय पातळीवर येथील समाजकल्याण विभागात जाऊन न्याय मागत होते. १५ ते १६ वर्षे नोकरी करून फिर्यादीच्या आईस संस्थेने न्याय दिला नाही. पगाराकरिता कोणताही पाठपुरावा केलेला नसल्याने त्यांचे कुटुंबीय हे आर्थिक अडचणीत आले होते. त्यामुळे मयत भानुदास हे नेहमी मानसिक तणावाखाली राहत असे.फिर्यादीचे वडील रात्री घरी न आल्याने भाऊ धनराज हे शासकीय विश्रामगृहात जाऊन धनंजय पाटील यांच्याकडे चौकशी केली असता, भानुदास मुक्कामाकरिता विश्रामगृहात आल्याचे त्यांना समजले. त्यांनी विश्रामगृहाच्या जास्वंदी बिल्डिंगमधील पहिल्या मजल्यावर कक्ष (क्रमांक १४) मध्ये जाऊन पाहणी केली असता,तेथे भानुदास यांनी गळफास घेतला होता. त्यांच्या शर्टाच्या खिशात एक सुसाईड नोट मिळून आली. त्यानुसार संस्था चालक अशोक लांबतुरे, सुरेखा लांबतुरे, मधुकर गवळी, मुख्याध्यापिका अलका गवळी, सावळा शिंदे, शंकर जाधव, नागनाथ बनसोडे, पांडुरंग कांबळे व विलास इरकशेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात बांधकाम विभागातील कर्मचाºयांची गळफास घेऊन आत्महत्या, सोलापूर शहरात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 1:03 PM
शहरातील सातरस्ता येथील शासकीय विश्रामगृहातील पहिल्या मजल्यावरील जास्वंदी कक्ष (क्रमांक १४) मध्ये भानुदास सोपान शिंदे (वय ५९,रा. जुळे सोलापूर ) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी यमाईदेवी आश्रमशाळेच्या संस्थाचालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
ठळक मुद्देयमाईदेवी आश्रमशाळेच्या संस्था चालक अशोक लांबतुरे, सुरेखा लांबतुरे, मधुकर गवळी, मुख्याध्यापिका अलका गवळी, सावळा शिंदे, शंकर जाधव, नागनाथ बनसोडे, पांडुरंग कांबळे व विलास इरकशेट्टी यांच्यावर गुन्हा दाखल सार्वजनिक बांधकाम विभागात मयत भानुदास शिंदे कामाला होते