पेनूर : मोहोळ तालुक्यासाठी प्रतिष्ठेच्या बनलेल्या पेनूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अवघ्या २२ वर्षाचे पदवीधर युवक सुजित महावीर आवारे यांची तर उपसरपंचपदी मयुरी सागर चवरे यांची निवड झाली आहे .
पेनूरच्या इतिहासात प्रथमच बौद्ध समाजातील व्यक्ती सरपंचपदी विराजमान झालेली आहे. विशेषत: सरपंच पद हे सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित असताना देखील परिवर्तन ग्रामविकास पॅनलने सुजित आवारे यांना सरपंचपदी विराजमान केले आहे.
पेनूर गावातील सर्व दिग्गजांना धक्का देत सर्वपक्षीय युवकांनी ग्रामपंचायतीवर स्वत:चा झेंडा रोवला आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, कुमार आवारे, भाऊसाहेब सलगर, माजी संरपच नागनाथ चवरे, चरण चवरे, भाजपा सरचिटणिस रमेश माने, रणजित चवरे, आचित चवरे, माजी सदस्य सज्जन रंदवे, विकी सलगर, बाळासाहेब चवरे, सुहास चवरे, राजू चवरे उपस्थित होते.
दरम्यान या निवडीत चरणराज चवरे, रामदास चवरे, छाया चवरे, कावेरी चवरे, जयश्री रणदिवे, वर्षा सलगर, सज्जू शेख, रजनीकांत चवरे, विठ्ठल माने, शिवसागर गायकवाड, सुजाता गवळी, मनीषा माळी, अनिता पटकळे, उज्वला माने यांनी मतदानाचा हक्क बजाविला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वसेकर यांनी काम पाहिले. ग्रामसेवक संतोष पाटील व तलाठी बी. एस. बेले यांनी सहकार्य केले.
---
संरपच पदासाठी आले दोन अर्ज
सरपंच पदासाठी दोन जणांचे अर्ज आले होते. सुजित महावीर आवारे आणि गिरीष गवळी या दोघांमधून सुजित आवारे यांना ९ मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. उपसंरपच पदासाठी देखील एकूण दोन अर्ज आले होते. मयुरी सागर चवरे आणि उज्वला माने यांच्यातून मयुरी चवरे यांना ९ मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.
---
२५ पेनूर
पेनूरच्या सरपंचपदी सुजित आवारे, उपसरपंचपदी मयुरी चवरे यांची निवड झाली. यावेळी सरपंच, उपसरपंचासह सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला.