विविध तक्रारीबाबत फेब्रुवारी महिन्यात ‘लोकमत’ने बातमी प्रसिद्ध केली होती. याबाबतची सर्व स्तरावर कारवाई पूर्ण होऊन अखेर दुकान निलंबन झाले.
या रेशन दुकानाबाबत वारंवार तक्रारी पुढे येत होत्या. यात डिसेंबर, २०२० मधील धान्यसाठा परवानगीशिवाय इतर ठिकाणी ठेवणे, कार्डधारकास वेळेवर धान्य न देणे, धान्यसाठा रासायनिक खताच्या गोडाउनमध्ये ठेवणे, दुकानाबाबत वेळापत्रकाचा फलक न लावणे, मशीन बंद पडल्यामुळे लोकांना धान्य वितरित न करणे, धान्य वितरणाबाबत अनियमितता, अरेरावीची भाषा करणे, वारंवार दुकान बंद ठेवणे आदी तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हापुरवठा अधिकाऱ्यांनी सदर दुकान निलंबित केले आहे.