काशिनाथ वाघमारेसोलापूर : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चाललाय़ चटके आणि झळांपासून संरक्षण करणारी टोपी, बंडी, स्कार्फ, स्टोल, हँडग्लोज, सनकोटसह अनेक वस्तू बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत़ या वस्तू खरेदीसाठी नवीपेठेसह अनेक ठिकाणी ग्राहकांची गर्दी होत आहे़महिला आणि मुलींसाठी लागणाºया सनकोट, स्टोल, स्कार्फ आणि हँडग्लोजला सध्या मागणी वाढत आहे.
बहुभाषिक सोलापुरात बाराबंकी (उत्तर प्रदेश) हून स्टोल आणि मुंबईतून हँडग्लोज दाखल झाले आहेत. याबरोबरच स्थानिक पातळीवरचे स्कार्फ मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. लांबलचक आणि मनगटापर्यंतचे हँडग्लोज पांढरा, केशरी आणि स्कीन कलरमध्ये उपलब्ध झाले आहेत.
शहरात नवीपेठ, दत्त चौक, मधला मारुती, चाटी गल्ली, शिंदे चौक अशा अनेक परिसरातील बाजारपेठेत उन्हाळी वस्तू विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत़ उन्हाला प्रतिरोध करणाºया वस्तूंचा सध्या बाजारपेठेत रुबाब वाढला आहे़
गुलाबी व पांढºया कलरच्या बंडी
- लहान मुलांसाठी लागणारी उन्हाळी बंडी हा शब्द उच्चारला की पांढरा रंग डोळ्यांपुढे येतो़ मात्र यंदा या लहान मुलांची बंडी सहा रंगात उपलब्ध झाली आहे़ गुलाबी, निळा, पिवळा, पिस्ता, जांभळा, पिवळा, केशरी अशा रंगात ही बंडी उपलब्ध झाली आहे़ शंभर रुपये ते १८० रुपयांपर्यंत या बंडी विकल्या जात आहेत़ डोळ्याला आणि शरीराला शीतलता देणारी गुलाबी बंडी साºयांना खुणावते आहे़
हमराज, ज्वेलथीफ, कमांडो जुन्या टोप्या नव्या रूपात...
- च्ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट काळातील हमराज, ज्वेलथीफ, भगतसिंग आणि मिल्ट्री कमांडो अशा अनेक प्रकारच्या जुन्या टोप्या आणि नव्या रूपात दाखल झाल्या आहेत़ जवळपास अशा ४० प्रकारच्या टोप्या बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत़ ४० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंतच्या टोप्या बाजरात पाहायला मिळताहेत़ यामध्येही वेल्क्रो, ईलॅस्टिक आणि क्लीप अशा तीन प्रकारात या टोप्या असून, पांढºया रंगांच्या टोप्यांना सर्वाधिक मागणी आहे़