दिव्यांगांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करते; मात्र दिव्यांग असतानाही स्वतःच्या कौशल्याने, जिद्दीने शिक्षण घेणारा पिलीव (ता . माळशिरस) येथील दिव्यांग तरुण सूरज शब्बीर मुजावर हा दोन्ही पाय नसताना रोजच्या व्यवहारातील दैनंदिन कामाबरोबर लिखाणाचेही अस्खलितपणे काम करत दिव्यांगांसमोर नवा आदर्श निर्माण करीत आहे.
शिक्षणाची जिद्द
सर्वसामान्य कुटुंबातील जन्मताच दोन्ही पायाने अपंग असणाऱ्या सूरजला त्याच्या आजोबांनी स्वावलंबनाचे बाळकडू दिले. त्यामुळे सूरजने पायांच्या बोटात पेन्सील धरून शिक्षणाचा श्रीगणेशा केला. यानंतर त्याने पायाने पेपर लिहून दहावीला ६५ टक्के गुण मिळवले. सध्या तो कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय (पिलीव) येथे बारावीच्या वर्गात शिकत आहे. त्याचे वडील सायकल दुरुस्ती व चप्पलचे दुकान चालवून चरितार्थ चालवतात; मात्र सूरजला इतर मुलांप्रमाणे स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी संपूर्ण कुटुंबाचा जिद्दीनेे प्रवास सुरू आहे.
फोटो लाईन
०२पंड०५
दिव्यांग सूरज