सोलापूर : भारतीय जैन संघटना राज्यकार्यकारिणी, उद्योग व व्यापार आघाडीची नवनिर्वाचित समिती पदाधिकारी यांची ऑनलाइन सभा रविवार, दि. ३० मे रोजी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत इंदोरे (म.प्र.) येथील मॅनेजमेन्ट गुरू राकेश जैन हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती समिती राज्य प्रमुख केतन शहा यांनी दिली.
उद्योग व व्यवसाय, लघु उद्योग, कुटीर उद्योग, गृह उद्योग व व्यापार क्षेत्रातील वेग वेगळे सेमिनार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजन करण्याकरिता व त्री मासिक आराखडा तयार करण्याकरिता मार्गदर्शन केले जाणार आहे.
व्यवसाय व उद्योग वाढीसाठी अनेक शासकीय योजना, अनुदान, कमी व्याजदरात भांडवल इत्यादीसाठी तसेच कोरोनाच्या नंतर व्यापार व उद्योग वाढीसाठीचे मंत्र, लहान व्यापार मोठे स्वप्न, गृहिणी ते उद्यमी, आत्मनिर्भर भारत आदी विषयांवर राकेश जैन हे मार्गदर्शन करणार आहेत. राज्य अध्यक्ष हस्तीमल बंब व प्रभारी नंदू साखला यांनी राज्यव्यापी समिती गठित केली असून, राज्य प्रमुख म्हणून केतन शहा यांची घोषणा केली आहे.
---
२८ राकेश जैन