सोलापूर : रविवार २४ मार्च रोजी असणारे चंद्रग्रहण हे छायाकल्प ग्रहण आहे. या ग्रहणाचे कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही. त्यामुळे रविवारी नेहमीप्रमाणे होळी पेटवावी, असे पंचांगकर्ते दाते यांनी सांगितले.
रविवार २४ मार्च रोजी सायंकाळी होळी पौर्णिमा साजरी करायाची आहे. होलिका प्रदीपन विधी करायचा आहे. धूलिवंदनाच्या दिवशी सोमवार २५ मार्च रोजी सकाळी १०:२१ पासून दुपारी ३:०५ पर्यंत छायाकल्प चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे होळीच्या रंगाच्या उत्सवावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही.
फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होळीचा सण साजरा केला जातो. यावर्षी २५ मार्चला होळी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार १०० वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहण असणार आहे. २५ मार्चचे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे त्याच्या वेधाचे नियम पाळण्याची गरज नाही. होळी साजरी करण्यावर काहीही बंधने येणार नाहीत. तसेच पूजा-पाठावरही काही परिणाम होणार नाहीत.भारतात हे छायाकल्प चंद्र ग्रहण दिसणार नसून भारताबाहेर काही ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे. पण, त्याचे नियम पाळायचे नाहीत. २४ मार्च रोजी रविवारी होळी नेहमी प्रमाणे सूर्यास्त झाल्यावर प्रदोष काळात म्हणजे साधारणपणे रात्री ९ पर्यंत पेटवावी आणि होळीचा सण साजरा करावा .मोहन दाते, पंचांगकर्ते