सोलापूर: सोलापूरचे प्रसिद्ध सुंद्री वादक पंडित भीमण्णा जाधव यांना अयोध्येत रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यात सुंदरीचे मंजूळ अन पवित्र स्वर प्रकट करण्यासाठी खास निमंत्रण मिळाले आहे.
भगवान श्रीरामाच्या जन्मस्थानी भव्य मंदिर उभारल्यामुळे देशात एक वेगळीच उत्साहाचं वातावरण आहे राम मंदिरात अभिषेक होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले असून संपूर्ण देश या भव्य सोहळ्याचा साक्षीदार होणार आहे. भारताचे दुर्मिळ सुषीर वाद्याचे प्रचार प्रसारक म्हणून पंडित भिमण्णा जाधव यांना सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार व केंद्रीय संगीत नाटक अकादेमी यांच्याकडून सुंद्री वाद्यवादना करिता खास राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.
सुवर्ण महोत्सव अंतर्गत भारतातील विविध राज्यातील 25 टापर्स कलाकारांना बोलवण्यात आले आहे. त्यामध्ये पंडीत जाधव यांचा समावेश आहे. यापूर्वी सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून जाधव यांना सप्टेंबर 2023 मध्ये G20 शिखर संमेलन व तसेच यशोभूमी कार्यक्रमांतर्गत करिता खास निमंत्रण देण्यात आलेलं होतं. पंडित जाधव हे सुंद्रीसम्राट सिद्राम जाधव यांचे नातू आहेत. तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू, श्रीमती इदिरा गांधी यांनी सुंद्रीवाद्याची प्रशसा केली होती. पंडीत भिमण्णा जाधव यांनी वयाच्या 7 व्या वर्षी त्यांनी युवावाणी ऑल इंडिया रेडिओसाठी प्रसारक म्हणून सार्वजनिक पदार्पण केले. सोलापूर सुंदरी हे दुर्मिळ आणि अद्वितीय वाद्य आहे. पंडित भीमण्णा यांनी या वाद्याचा भारताच्या सीमेपलीकडे गौरव केला आहे, त्यांनी फ्रान्स आणि बेल्जियममध्ये आपली कला सादर करून आपल्या कुटुंबाची स्वप्ने साकार केली आहेत.