सुजल पाटील
सोलापूर : सोलापूर स्थानकावरून रेल्वेने प्रस्थान ठेवले...वाºयाच्या गतीने धावणाºया एक्स्प्रेसमधून मदत करा.. मदत करा.. असा आवाज येऊ लागला...हा आवाज ऐकून आरपीएफ पोलिसांनी प्रसंगावधान राखत काय झाले हे पाहण्यासाठी बोगीत घुसले. याचवेळी गर्भवती महिलेच्या वेदना पाहून पोलिसांनी क्षणाचाही विचार न करता एक्स्प्रेस रेल्वे जागेवर थांबविली़ शासकीय रुग्णवाहिका न आल्याने खासगी रुग्णवाहिकेचा आधार घेत वेळेवर त्या महिलेस रुग्णालयात पोहोचविले अन् त्या महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला.
दरम्यान, मुुंबईहून बंगळुरुकडे निघालेल्या विशेष एक्स्प्रेसने सोलापूर सोडले़ सोलापूर रेल्वे स्थानकापासून थोड्या अंतरावर गाडी पोहोचली असता रेल्वेने प्रवास करणाºया मीनाक्षी मनोज राठोड (वय २०, रा़ मुंबई पाडा, भिवंडी, ठाणे) या गर्भवती महिलेस त्रास होऊ लागला़ सोबतच असलेल्या भावाने मदतीसाठी आरडाओरडा करायला सुरुवात केली़ दरम्यान, ड्युटीवर असलेले सुरक्षा बलाचे जवान (आरपीएफ पोलीस) शफिक शेख यांना महिलेस त्रास होत असल्याचे कळताच तत्काळ नियंत्रण कक्षाला फोन करून गाडी थांबविण्याची विनंती केली, विनंती करताना रेल्वेच्या चालकाने प्रसंगावधान राखत टिकेकरवाडी स्टेशनवर गाडी थांबविली़ तत्काळ गाडीतून खासगी वाहनाने सोलापूर गाठले़ आसरा चौकातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता काही वेळातच त्या महिलेने मुलाला जन्म दिला़ वेळेवर दाखल केल्यामुळे आता मुलगा व आई दोघेही चांगले असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाने कळविले. २० मिनिटे थांबली एक्स्प्रेस...मुंबईहून बंगळुरुकडे निघालेली सुपरफास्ट उद्यान एक्स्प्रेस त्या गर्भवती महिलेच्या मदतीसाठी २० मिनिटे टिकेकरवाडी स्टेशनवर थांबली होती, याचवेळी त्या गर्भवती महिलेच्या मदतीसाठी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचाºयांनीही मोठी मदत केली. या महिलेस रुग्णवाहिकेतून सोलापूरकडे पाचारण केल्यावरच रेल्वेने टिकेकरवाडी स्टेशन सोडले़ आरपीएफ जवानांचे सोशल मीडियावर कौतुकप्रसंगावधान राखत गर्भवती महिलेस मदत मिळवून देणाºया आरपीएफ पोलिसांच्या कामगिरीची वार्ता सोशल मीडियावर पसरली़ काही तासातच ही वार्ता वाºयासारखी सोशल मीडियावर व्हायरल झाली़ त्यानंतर मदतीसाठी धावून येणारे आरपीएफ जवान शफिक शेख, कॉन्स्टेबल चरणसिंग, कॉ़ संजय प्रसाद, रामचंद्र यांच्यासह रेल्वे प्रशासनाचे नेटिझन्ससह त्या गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांनी कौतुक केले़