सोलापूर : भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईला जाणाºया भीमसैनिकांसाठी मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातून दोन विशेष गाड्या धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही होणारी वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून मुंबईला जाण्यासाठी गुरूवार, दिनांक ५ डिसेंबर २०१९ रोजी रात्री ९़३० वाजता सोलापूर स्थानकातून गाडी सुटणार आहे़ ही गाडी सकाळी ८़२० वाजता मुंबईत पोहोचणार आहे़ सोलापूरहून मुंबईला जाणारी गाडी सोलापूर-कुर्डूवाडी-दौंड-पुणे-लोणावळा-कर्जत-कल्याण-दादर-मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी धावणार आहे.
दरम्यान, कलबुर्गीहून मुंबईला जाण्यासाठी गुरूवार, दिनांक ५ डिसेंबर २०१९ रोजी संध्याकाळी ६़२५ वाजता कलबुर्गी स्थानकातून विशेष गाडी सोडण्यात येणार आहे़ सकाळी ८़२० वाजता मुंबईला पोहोचणार आहे़ याशिवाय मुंबईहून सोलापूरकडे येण्यासाठी ७ डिसेंबर २०१९ रोजी रात्री १२़२५ वाजता मुंबईहून सुटेल व सकाळी १०़१० वाजता सोलापुरात पोहोचणार आहे़ कलबुर्गीला जाण्यासाठी ७ डिसेंबर रोजी १२़२५ वाजता गाडी सुटणार असून, दुसºया दिवशी दुपारी १़४० वाजता कलबुर्गीला पोहोचेल.
विशेष गाडीला ११ डबे जोडले़...- सोलापूरहून निघणाºया विशेष गाडीला ११ डबे जोडण्यात येणार आहेत़ याशिवाय कलबुर्गीहून निघणाºया विशेष गाडीला ७ डबे जोडण्यात येणार आहेत़ तरी प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे़ प्रवाशांनी रेल्वे गाडीच्या दाराजवळ, टपावरती बसून रेल्वे प्रवास करू नये, जेणेकरून प्राणहानी होणार नाही याची काळजी घ्यावी़ दरम्यान, रेल्वेस्थानक व परिसर स्वच्छ ठेवण्यास रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे़
आरपीएफ पोलिसांचा असणार वॉच- कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी आरपीएफ पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार आहे़ याशिवाय प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठीही आरपीएफ पोलीस प्रयत्न करणार आहेत़ प्रवाशांनी रेल्वे गाडीच्या दाराजवळ, टपावरती बसून रेल्वे प्रवास करू नये, असे आवाहन आरपीएफचे सुरक्षा आयुक्त मिथुन सोनी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले आहे.