सोलापूर : सकल मराठा समाजाला कुणबी मराठा आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली-सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ भोसे येथे उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांना मुंडन करून पाठिंबा दिला. शिवाय विविध ग्रामपंचायतीने ठराव करून पाठिंबा दर्शविला आहे.
मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला १४ दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप आरक्षणाचा मार्ग मोकळा होत नसल्याने शासनाच्या धोरणाचा विविध स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. दिवसेंदिवस आंदोलनाची धार अधिक तीव्र होत आहे. विविध सामाजिक संघटना, ग्रामपंचायती, आजी-माजी पदाधिकारी, उपोषणकर्ते चांगदेव तळेकर, नितीन तळेकर, सचिन भिंगारे आणि युवराज घाटे यांची भेटी घेऊन पाठिंबा देत आहेत.
भोसे, नेमतवाडी, नेवरे, पांढरेवाडीच्या कार्यकर्त्यांनी केले मुंडनमनोज जरांगे-पाटील यांच्या लढ्याच्या समर्थनार्थ भोसे येथील उपोषणकर्त्यांना पुरुषोत्तम तळेकर, अमोल तळेकर, शहाजी कोरके, पांडुरंग सुरवसे, माउली कोरके, शिवाजी कोरके, पोपट सावंत, बबलू गायकवाड, राम कोरके, बुवा गावंधरे, प्रकाश आदमिले, महावीर घोडके, धनाजी चव्हाण आणि नीलेश कदम यांनी मुंडन करून समर्थन केले. उपोषणाला वाढता पाठिंबा भोसे येथील उपोषणकर्त्यांना करकंबचे ॲड. शरद पांढरे, संभाजी ब्रिगेडचे अमोल शेळके, ग्रा. पं. सदस्य विवेक शिंगटे, समाधान गुंड, तुषार खाडे यांच्यासह संभाजी ब्रिगेड, प्रहार संघटना, शिवशंभू संघटना, बार्डी, जाधववाडी, पांढरेवाडी, सुगाव-भोसे यांच्यासह माढा तालुक्यातील तंबावे आणि परिते ग्रामपंचायतीने ठराव करून पाठिंबा जाहीर केला आहे.