सुरत निकाल : सोलापुरात युवक काँग्रेसचे मोदींविरोधात आंदोलन, प्रतिकात्मक पुतळ्यासमाेर घाेषणाबाजी
By राकेश कदम | Published: March 23, 2023 07:44 PM2023-03-23T19:44:02+5:302023-03-23T19:50:16+5:30
युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष गणेश डाेंगरे आणि कार्यकर्ते गुरुवारी दुपारी काॅंग्रेस भवनसमाेर जमले. कार्यकर्त्यांनी एक प्रतिकात्मक पुतळा आणला हाेता. या पुतळ्याला पंतप्रधान नरेंद्र माेदी, ललित माेदी आणि नीरव माेदी यांच्या प्रतिमा हाेत्या.
गुजरातमधील सुरत न्यायालयाने काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना माेदींबाबतच्या वक्तव्याप्रकरणी दाेन वर्षांची शिक्षा सुनावली. यापार्श्वभूमीवर युवक काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी काॅंग्रेस भवनसमाेर पंतप्रधान नरेंद्र माेदी, ललिल माेदी, नीरव माेदी यांच्या प्रतिमा दाखवून आंदाेलन केले.
युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष गणेश डाेंगरे आणि कार्यकर्ते गुरुवारी दुपारी काॅंग्रेस भवनसमाेर जमले. कार्यकर्त्यांनी एक प्रतिकात्मक पुतळा आणला हाेता. या पुतळ्याला पंतप्रधान नरेंद्र माेदी, ललित माेदी आणि नीरव माेदी यांच्या प्रतिमा हाेत्या. माेदी सरकारचा निषेष असाे, हुकूमशाहीचा निषेध असाे अशा घाेषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष गणेश डाेंगरे म्हणाले, राहुल गांधी हुकुमशाहीच्या विरोधात आवाज उठवत आहेत. माेदी नावाचे अनेक लाेक देशाला लुबाडून पळून गेले. राहुल गांधी चुकीला चुकीचे म्हणण्याचे धाडस दाखवत आहे. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी हुकूमशहा मोदी सरकार कधी ईडी, कधी पोलिस तर कधी शिक्षा देऊन धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. या विरुध्द आंदाेलन करुन आम्ही निषेध नाेंदवित आहाेत. यावेळी युवक काँग्रेस सचिव प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, माजी परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, गणेश साळुंखे, महेंद्र शिंदे, शशिकांत शेळके, किरण राठोड, विवेक इंगळे, अशितोष वाले, गणेश वाघमारे आदी उपस्थित होते