तडवळेतील गोपीनाथ आणि सुधामती कांबळे यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत दिवसभर दुसऱ्या शेतात मोलमजुरी करायची आणि रात्री कडबा काढण्याची सुगी करायची, अंगावर कामे घ्यायची. रुपया रुपया जोडून वेळप्रसंगी हातउसने घेऊन मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. काही झालं तरी मुलांच्या शिक्षणाला पैसा कमी पडू द्यायचे नाही एवढे ठरवले. थोरला दादासाहेब बीटेक झाला. तो पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीत १० लाखांचे पॅकेज घेऊन अभियंता म्हणून कार्यरत आहे. लहान शरण सुरुवातीपासूनच हुशार होता. त्याने बारावीत ९१ टक्के गुण मिळवले. इंजिनिअरिंगच्या परीक्षेतही ९.५ पाॅइंटर प्रथम श्रेणीत उत्तीर्णही झाला. तोही बी टेक झाल्यानंतर बेंगळुरूच्या भारतीय वैज्ञानिक संस्थेमध्ये मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी ही पदवी प्राप्त केली. नंतर एका इंटरनॅशनल कंपनीच्या २० लाखांच्या पॅकेजला नकार देत यूपीएससीची तयारी केली.
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या सेंट्रल पोलीस फोर्स परीक्षेमध्ये सीएपीएफच्या सहायक कमांडर पदासाठी ऑगस्ट २०१९ मध्ये परीक्षा दिली. या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश आला. देशांमध्ये आठवा क्रमांक मिळवल्याचे तो आनंदाने सांगत होता.
पोरगं काय शिकलं माहीत नाय; पण साहेब झाल्याचा आनंद
मला माझा पोरगा काय शिकला हे माहीत नाही; पण साहेब झाला एवढे मात्र कळतंय, अशी भोळीभाबडी प्रतिक्रिया शरणची आई सुदामती कांबळे यांनी दिली. परिस्थिती बदलाचा चमत्कार फक्त शिक्षणातूनच घडू शकते. यावर ठाम विश्वास होता म्हणून आम्ही पती-पत्नीने काबाडकष्ट करून मुलांना शिकवले. त्याचे चीज झाल्याचे वडील गोपीनाथ कांबळे यांनी सांगितले.
फोटो
०६ पानगाव ०१
ओळी
तडवळे, ता. बार्शी येथील शरण कांबळे हा यूपीएससी परीक्षेत देशात आठवा आल्यानंतर आई-वडिलांनी डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला.
०२
शरण कांबळे याच्या यशानंतर पेढे भरून आनंद साजरा करताना कांबळे कुटुंबीय.