पानगांव : सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारिणीच्या क्रीडा सचिवपदी सूर्यकांत गुंड यांची तर ज्योत्स्ना डोके यांची स्पर्धा सचिवापदी बिनविरोध निवड झाली. सुरेश गुंड हे बावी ( आ. ) येथील शरदचंद्र पवार माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय बावी येथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. तर ज्योत्स्ना गुंड या पांगरीत शिवछत्रपती विद्यामंदिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आहेत.
पंढरपूर तालुक्यात भटुंबरे येथे झालेल्या जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सर्वसाधारण सभेत ही निवड झाली आहे. यावेळी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष माने यांनी या निवडी जाहीर केल्या. यावेळी रंगसिद्ध दसाडे, सोनटक्के, पवार, महेश सरवदे, बापू नीळ, विश्रांत गायकवाड, बार्शी तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजकुमार पुजारी, सचिव किशोर डुरे-पाटील, उपाध्यक्ष धनंजय चिकणे, महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे जिल्हा उपाध्यक्ष पप्पू देशमुख, तालुका अध्यक्ष आण्णासाहेब मोरे, बाळे पतसंस्थेचे माजी चेअरमन मुकुंद मोहिते, जिल्हा प्रतिनिधी राजेश उकिरडे, वनिता काळे, प्राचार्य आण्णासाहेब पाटकुलकर, मुख्याध्यापिका खोगरे, मुख्याध्यापिका वैद्य, सतीश गुंड, प्रमोद सारंग, महादेव ठाकरे, मुख्याध्यापक संकपाळ, चव्हाण, धनंजय सुरवसे, अमोल कुरुंद, सरक, कांबळे उपस्थित होते. संस्थाचालक बाळासाहेब कोरके, डॉ कपिल कोरके,माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेखा कोरके, प्राचार्य विनायकराव डोईफोडे यांनी कौतुक केले.
----
फोटो : १२ सूर्यकांत गुंड
१२ ज्योत्सना