शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

सुशीलकुमार शिंदेंना ३७ लाखांची देणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 2:50 PM

सुशीलकुमार शिंदे यांच्या उत्पन्नात चार वर्षांत २१ लाखांनी तर त्यांची पत्नी उज्ज्वला यांच्या उत्पन्नात ९६ लाखांनी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देशिंदे यांच्या बँक खात्यात १ लाख ६० हजार तर पत्नीच्या खात्यात ५० हजारांची रोकडशिंदे यांच्या नावे २ लाख १० हजार तर पत्नीच्या नावे १० लाख ९६ हजारांची गुंतवणूक शिंदे यांच्या नावे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे ३० हजारांचे शेअर्स आहेत

सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्यांदा निवडणूक रिंगणात असलेले काँग्रेसचे उमेदवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उत्पन्नात चार वर्षांत २१ लाखांनी तर त्यांची पत्नी उज्ज्वला यांच्या उत्पन्नात ९६ लाखांनी वाढ झाली आहे. उमेदवारी अर्जासोबत शिंदे यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ३७ लाखांची देणी असल्याचे म्हटले आहे. 

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सन २०१४ मध्येही लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी उमेदवारी दाखल करताना सादर केलेले उत्पन्न ५७ लाख ९१ हजार १८० रुपये तर पत्नी उज्ज्वला यांचे उत्पन्न ६ लाख २४ हजार ४१० रुपये इतके असल्याचे नमूद केले होते. आता सन २०१७-१८ मध्ये शिंदे यांनी वार्षिक उत्पन्न ७९ लाख ६० हजार ४८० तर पत्नीच्या नावे १ कोटी २ लाख ३२ हजार ८८० रुपये असल्याचे नमूद केले आहे. 

शिंदे यांच्या बँक खात्यात १ लाख ६० हजार तर पत्नीच्या खात्यात ५० हजारांची रोकड आहे. शिंदे यांच्या नावे २ लाख १० हजार तर पत्नीच्या नावे १० लाख ९६ हजारांची गुंतवणूक आहे. शिंदे यांच्या नावे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे ३० हजारांचे शेअर्स आहेत. तसेच एनएसएसमध्ये ४० हजार तर पीपीएफमध्ये ७५ लाख १४ हजार स्वत:च्या तर १७ लाख ७९ हजार पत्नीच्या नावे डिपॉझिट आहेत. 

फॉर्च्युनर, ट्रॅक्टर, टेम्पो- शिंदे यांच्या नावे एक ट्रॅक्टर व एक फॉर्च्युनर कार, एक जनरेटर आहे, तसेच पत्नीच्या नावे एक ट्रॅक्टर व एक टेम्पो, दोन जनरेटर आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथे शिंदे यांच्या नावे १८.७५ एकर (आज बाजारभाव किंमत: १ कोटी ४८ लाख) तर पत्नी उज्ज्वला यांच्या नावे ७.७५ एकर (किंमत: ५५ लाख ८५ हजार) शेती आहे. तसेच पत्नी उज्ज्वला यांच्या नावे कोलड (जि. रायगड) येथे फार्महाऊस व एरंडवणे (पुणे) येथे फ्लॅट आहे. त्याचबरोबर शिंदे यांच्या नावे अशोकनगर येथे घर व मुंबईत पॉली हिल येथे फ्लॅट, दिल्लीत मुनरिका विहारमध्ये फ्लॅट आहे. अशाप्रकारे शिंदे यांच्या नावे असलेल्या संपत्तीची किंमत ९ कोटी ९६ लाख तर पत्नी उज्ज्वला यांच्या नावे १० कोटी ११ लाख आहे. 

९५५ ग्रॅमचे दागिने- शिंदे कुटुंबीयांकडे ३१ लाख ८९ हजारांचे ९५५ ग्रॅमचे सोन्याचे दागिने आहेत. यामध्ये शिंदे यांच्याकडे सोनसाखळी व अंगठी ४० ग्रॅमची आहेत. पत्नी उज्ज्वला यांच्याकडे नेकलेस, गंठण, बांगड्या आणि रिंग असे ९१५ ग्रॅमचे दागिने आहेत. शिंदे यांच्या नावे एकही गुन्हा किंवा न्यायालयात खटला नाही. शिंदे यांनी ३७ लाख ५० हजार व पत्नीच्या नावे १० लाखांचे कर्ज घेतल्याचे नमूद केले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकcongressकाँग्रेस