पराभव झाला म्हणून घरात बसलो नाही : सुशिलकुमार शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 03:20 PM2018-12-07T15:20:00+5:302018-12-07T15:21:32+5:30
राजकारणात जय-पराजय होतच असतात
सोलापूर : लोकसभा निवडणुकीत पराभव झाला म्हणून मी घरात बसलो नाही, तर निकालानंतर सहाव्या दिवशी परत काम सुरू केले, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने दत्तनगर येथे पूर्व भागातील युवक मेळावा आयोजित केला होता. यावेळी मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सोलापूरच्या जनतेने मला १२ वेळा निवडून दिले. एकदा चूक घडली म्हणून कुठे बिघडले. मोदी हे मोठे नाटककार आहेत, हे लोकांना साडेचार वर्षात कळून चुकले आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी जनतेचे काम करत राहणार आहे, असे ते म्हणाले.
याप्रसंगी आमदार प्रणिती शिंदे, शहर अध्यक्ष प्रकाश वाले, युवक अध्यक्ष अंबादास करगुळे, नगरसेवक चेतन नरोटे, विनोद भोसले, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, अरुण शर्मा, अनिल पल्ली, मेघनाथ येमूल, योगेश मार्गम, विवेक कन्ना, प्रशांत पल्ली, सैपन शेख, श्रीधर बोल्ली, अमित श्रीराम, आप्पाशा म्हेत्रे, दत्तू बंदपट्टे, गणेश डोंगरे आदी उपस्थित होते. मेळावा यशस्वी करण्यासाठी सुभाष वाघमारे, नरेश येलूर, जगदीश वासम, विजय निली, मनोहर माचर्ला, नागेश बोमड्याल, बबलू बागवान, बाबुराव क्षीरसागर, श्रीनिवास परकीपंडला, एजाज बागवान, गणेश गुंडला यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन तिरुपती परकीपंडला यांनी केले तर शेवटी गोवर्धन कमटम यांनी आभार मानले.