शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
5
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
6
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
8
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
9
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
10
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
12
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
13
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
14
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
15
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
16
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
17
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
18
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
19
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
20
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार

सुशीलकुमार शिंदे यांनीच सोलापूर लोकसभेची निवडणुक लढवावी, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक बरडे यांचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 4:07 PM

‘साहेब’ काही झाले तरी सोलापुरातून तुम्हीच लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहा’, असे साकडे काँग्रेसच्या नव्हे तर शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम बरडे यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना आज घातले. 

ठळक मुद्देआपण लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे संकेत सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतेच दिले होतेशिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी महेश कोठे यांची नियुक्ती केल्यापासून बरडे नाराज सोलापुरातील राजकारणाची गणिते बदलण्याची चर्चा

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर : ‘साहेब’ काही झाले तरी सोलापुरातून तुम्हीच लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहा’, असे साकडे काँग्रेसच्या नव्हे तर शिवसेनेचे सोलापूर जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम बरडे यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांना आज घातले. आपण लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे संकेत सुशीलकुमार शिंदे यांनी नुकतेच दिले होते. त्यानंतर विद्यमान खासदार अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी शिंदे हेच आपले प्रतिस्पर्धी असतील, असा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असतानाच बरडे यांनी मंगळवारी सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘जनवात्सल्य’ या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रकाश यलगुलवार, महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, माऊली पवार उपस्थित होते. यावेळी बरडे यांना पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, शिंदे हे काँग्रेसचे तर मी शिवसेनेचा आहे. आमच्या पक्षप्रमुखांशी त्यांच्या वेळोवेळी भेटी होत असतात. त्यांच्यात कौटुंबिक मैत्री आहे. मी देखील अधून-मधून शिंदे यांना सोलापुरात भेटत असतो. यात मला काहीच गैर वाटत नाही, असे स्पष्ट करुन त्यांनी शिंदे यांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला.--------------------नाराजीमुळे बरडेंची भूमिका- शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी महेश कोठे यांची नियुक्ती केल्यापासून बरडे नाराज आहेत. त्यातच कोठे यांनी ऐनवेळी उमेदवारी कापल्याने महिला आघाडीच्या एक प्रमुखही नाराज आहेत. या दोन्ही नाराजांनी शिंदे यांच्याशी संपर्क वाढवला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत सोलापुरातील राजकारणाची गणिते बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे.-------------------शिंदे हे राजकारणातील भीष्म पितामहसुशीलकुमार शिंदे हे सोलापूर जिल्ह्याच्या  राजकारणातील भीष्म पितामह आहेत. दीर्घ राजकीय  व प्रशासकीय अनुभवाचा हा नेता आहे. त्यांचे सर्वच पक्षात संबंध आहेत. सोलापूर मनपावर ३०० कोटींचे कर्ज आहे. त्यातून तेच मार्ग काढू शकतील.  हा विश्वास आहे. म्हणून चर्चा करण्यासाठी त्यांची भेट               घेतली.  माझा वैयक्तिक कसलाही स्वार्थ नाही. खासदार शरद  बनसोडे, सहकारमंत्री  सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार  देशमुख हे  वेळोवेळी  शिंदे यांना भेटतच असतात. मी भेटलो म्हणून काय बिघडले.?  माझ्या भेटीची कल्पना लगेच मातोश्रीवर दिली आहे. उद्धवसाहेबांवर  गरळ ओकणाºया नारायण राणे यांच्या व्यासपीठावर  सोलापुरातील शिवसेनेचा एक पदाधिकारी जातो याची आम्हाला लाज वाटते. - पुरुषोत्तम बरडे, जिल्हा समन्वयक शिवसेना

टॅग्स :SolapurसोलापूरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदे