सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर महाराज, वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत होत आहे. या प्रमुख उमेदवारांसह एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
सोलापूरचा विद्यमान खासदार भाजपचा आहे; मात्र लढतीच्या केंद्रस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हेच आहेत. यंदा त्यांच्या विरोधात उजव्या आणि डाव्या शक्ती उभ्या ठाकल्या आहेत. त्यामुळे शिंदेंच्या टीकेचा रोख भाजप आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावरही आहे. भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज असले तरीे सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
आंबेडकरांच्या एंट्रीनंतर दोन देशमुखांनी सुस्कारा सोडला होता. पण प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी आंबेडकरी विचारांच्या सर्व संघटना एक झाल्या. काँग्रेस आणि भाजपतील काही नगरसेवक वंचित आघाडीच्या प्रचारात सक्रिय झाले. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी आंबेडकरांना पाठिंबा दिला. मुस्लीम आणि धनगर नेते वंचित आघाडीच्या प्रचारात सक्रिय झाल्याने भाजप नेतेही चक्रावले आहेत. मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार याकडे लक्ष आहे.सोलापूरच्या विकासासाठी एनटीपीसी, सीमा सुरक्षा बलाचे प्रशिक्षण केंद्र यासारखे प्रकल्प आणले. सोलापूर विद्यापीठ, बोरामणी विमानतळ, पुणे-सोलापूर राष्ष्टÑीय महामार्ग चौपदरीकरणाची कामे करुन घेतली; मात्र गेल्या पाच वर्षांत सोलापूरच्या विकासासाठी प्रयत्न झाले नाहीत.- सुशीलकुमार शिंदे,काँग्रेसमी यापूर्वी धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात काम केले आहे. आता सोलापूरचा पाणी प्रश्न, रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, येथील विमानसेवा सुरू करण्याबरोबरच शहरात उद्योगधंदे यावेत यासाठी मी प्रयत्न करणार आहे. अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कौशल्य विकास कार्यक्रम राबविणार.- डॉ. जयसिद्धेश्वर महाराज,भाजपसुशीलकुमार शिंदे आणि भाजपच्या वादात सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य माणूस विकासापासून वंचित राहिला. येथील वंचित बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडी काम करणार. पाणी, रोजगारापासून वंचित असलेल्या घटकांसाठी काम करणार.- अॅड. प्रकाश आंबेडकरवंचित बहुजन आघाडीप्रमुख उमेदवारसुशीलकुमार शिंदे । काँग्रेसडॉ. जयसिद्धेश्वर महाराज। भाजपअॅड. प्रकाश आंबेडकर । वंचित आघाडीकळीचे मुद्दे : शहराचा पाणी प्रश्न, शहरातील वाढती बेरोजगारी, विमानसेवेच्या थापा, रेल्वे मार्गाचे संथगतीने होणारे विद्युतीकरण, सोलापूर-हैदराबाद रस्त्याचे रखडलेले काम.