यावेळी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, किसान मोर्चा प्रदेश कार्यकारी सदस्य शिवाजीराव गायकवाड, शहराध्यक्ष आनंद फाटे, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष शिवाजी आलदर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, मागासवर्गीय तालुकाध्यक्ष तानाजी कांबळे, डॉ. विजय बाबर, एन. वाय. भोसले, डॉ. अनिल कांबळे, विलास व्हनमाने, माणिक सकट, वसंत सुपेकर, नागेश जोशी, लक्ष्मीकांत लिगाडे, मानस कमलापूरकर, संजय गंभिरे, उमेश मंडले, दीपक केदार, अवधूत केदार, बाळासाहेब चव्हाण यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
----
संघर्ष चालूच राहील
अधिवेशनात जनतेचे प्रश्न मांडले जाऊ नयेत, यासाठी हा आटापिटा सुरू आहे.
मराठा समाज आणि ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भाजप झगडत असताना भाजप आमदारांवर अशा प्रकारची कारवाही होणे चुकीचे आहे. अशा प्रकारच्या कितीही कारवाया झाल्या तरी भाजप सहन करीन; पण मराठा समाज व ओबीसी समाजाला न्याय मिळेपर्यंत भाजपचा संघर्ष सुरूच राहील. आघाडी सरकारने भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन मागे घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
----