शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

निलंबन आडम मास्तरांच्या पथ्यावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 5:07 AM

पार्क स्टेडियमवर झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाल्याप्रकरणी माकपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांच्यावर पक्षाने केंद्रीय समितीतून निलंबनाची कारवाई केली आहे.

सोलापूर : कम्युनिष्ट पक्षांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात सहभागी न होता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार्क स्टेडियमवर झालेल्या कार्यक्रमात सहभागी झाल्याप्रकरणी माकपचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांच्यावर पक्षाने केंद्रीय समितीतून निलंबनाची कारवाई केली आहे. माकपने ८ व ९ जानेवारी रोजी बेरोजगारांना रोजगार, शिक्षण, आदिवासींना जमीन आदी मागण्यांसाठी देशव्यापी संपाची हाक दिली होती़ माजी आमदार आडममास्तर हे माकपचे प्रदेश सचिव आहेत. त्यांनी ८ जानेवारी रोजी देशव्यापी संपात सहभाग नोंदविला, परंतु ९ जानेवारी रोजी माजी आमदार आडम मास्तर यांनी विडी व कष्टकरी समाजासाठी मंजूर करून आणलेल्या ३० हजार घरकुलांच्या प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होता. त्यामुळे आंदोलन बाजूला ठेवून ते या कार्यक्रमात सहभागी झाले.कामगारांची वसाहत, हेच निलंबनामागचे कारणनरसय्या आडम यांनी कामगारांसाठी ३० हजार घरांचा रे नगर नावाचा प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प केंद्रातील भाजपा सरकारने मंजूर केला आहे. या प्रकल्पातील घरांसाठी अर्धी रक्कम केंद्र आणि राज्य सरकार देणार आहे. लोकसभेला काँग्रेसचा प्रचार केल्यास आडम यांचा हा प्रकल्प अडचणीत येऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.