मूळ करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील सुवर्णा माने-झोळ या सोलापूर येथे सामाजिक वनीकरण कार्यालयात विभागीय वनअधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांची २०१६ च्या भारतीय वनसेवेच्या तुकडीत उपवनसंरक्षक अहमदनगर येथे राज्यसेवेतून केंद्रीय सेवेत पदोन्नती झाली आहे. राज्यात यापूर्वी वनविभागात महिला अधिकाऱ्यांनी विविध पदांवर काम केले आहे. राज्य सेवेतून भारतीय वनसेवेत जाण्याचा त्यांना पहिल्या महिला अधिकारी म्हणून मान मिळाला आहे.
यापूर्वी राज्यात वनविभागात विविध पदावर महिला अधिकाऱ्यांनी काम केले आहे मात्र राज्यसेवेतून IFS होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. वनविभागात आजपर्यंत वनरक्षक, वनपाल, वनक्षेत्रपाल या पदावर महिलांनी काम केले होते परंतु २००९ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पहिल्यांदाच सहाय्यक वनसंरक्षक या वर्ग १ च्या पदावर ८ महिला व २५ पुरुषांची नियुक्ती केली गेली.
आज त्या तुकडीचे सहा अधिकारी भारतीय वनसेवेत दाखल झाले असून त्यापैकी सुवर्णा माने या एकमेव महिला असून, त्या या पदावर राज्यसेवेतून जाणाऱ्या राज्यातील पहिल्या महिला ठरल्या आहेत.
सुवर्णा माने या मूळच्या करमाळा तालुक्यातील वशिंबे या गावच्या असून त्यांचे सासर वैराग, तालुका बार्शी हे आहे, त्यांचे पती रवींद्र माने हे सध्या प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी या पदावर सोलापूर येथे कार्यरत आहेत
२८ सुवर्णा माने-झोळ
वनविभागात राज्यवनसेवेतून केंद्रीय सेवेत जाणारी राज्यातील पहिली महिला IFS अधिकारी.