अकलूज: वयाच्या ११व्या वर्षी अपघातात दोन्ही अर्धे हात गमवावे लागल्याने परिस्थितीमुळे व्य॔गत्व आलेल्या सुयश नारायण जाधव या जिद्दी तरुणाने पुर्ण हात नाहीत म्हणुन न खचता आत्मविश्वासाच्या बळावर व्यंगत्वावर मात करीत जलतरण क्रिडा प्रकारात चिकाटीने प्रचंड मेहनत करुन आंतरराष्ट्रीय स्तरावरील जलतरण क्रिडा स्पर्धेत असामान्य कामगिरी केेेली.
सुयश जाधव यांच्या असामान्य कामगिरीसाठी भारत सरकारच्या युवा कल्याण व क्रिडा मंत्रालयाने सन २०२० च्या अर्जुुन पुरस्कारासाठी सुयश जाधव यांची निवड केली असुन अकलुजच्या शंकरराव मोहिते ज्युनिअर महाविद्यालयात सुयश जाधव याचे शिक्षण झाले आहे.
सुयश जाधव यांचे मुळगांव पांगरे ता.करमाळा येथील असुन त्याचे वडील नारायण जाधव हे शिक्षक म्हणून वेळापूर (ता.माळशिरस) येथे न्यु इंग्लिश स्कुलमध्ये नोकरीच्या निमित्ताने आले होते. सुयश जाधवचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परीषद शाळा वेळापुर येथे झाले. माध्यमिक शिक्षण न्यु इंग्लिश स्कूल वेळापुर येथे, उच्च माध्यमिक शिक्षण शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलुज येथे तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे झाले आहे. सध्या ते बालेवाडी पुणे येथे क्रिडाधिकारी वर्ग १ या पदावर कार्यरत आहेत.
लहानपणापासुनच सुयश जाधव यांना जलतरणाची मोठी आवड होती. वयाच्या ११ व्या वर्षी एका अपघातात त्यांचे दोन्ही अर्धे हात गमवावे लागले. परिस्थितीने व्यंगत्व आल्यानंतरही निराश न होता सुयश याने जिद्दीच्या जोरावर अफाट परीश्रम करीत जलतरण क्रिडा प्रकारात नैपुण्य प्राप्त करीत जलतरण क्रिडा प्रकारात भाग घेण्यास सुरवात केली.
सुयशचे मनोबल भक्कम असल्याने जिल्हा, राज्यस्तरावर यशाची पायाभरणीही भक्कम झाली.राज्यस्तरावर ५० सुवर्ण पदक मिळविल्यानंतर सुयशने राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेतुन ३७ सुवर्ण,६ रौप्य व ३ कास्यपदके मिळवली तर आंतर राष्ट्रीयस्तरावर ५ सुवर्ण,९ रौप्य,७ कास्यपदके कमवली. सुयशने आशियायी पॅरागेम्समध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली असुन वर्ल्ड जलतरण चॅम्पियनशीप स्पर्धेत दोन वेळा सहभाग घेतला आहे.त्यांनी आतापर्यंत १९८ टक्के मिळविली असुन २०२० टोकीओ येथील पॅराऑलेम्पिक जलतरण स्पर्धेसाठी सुयश जाधव पात्र ठरले आहेत.तर २०१६ साली राज्यशासनाच्यावतीने आंतरराष्ट्रीय स्तरा- वरील कामगिरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते ५० लाख रु व एकलव्य पुरस्कार देेेेवुुुन सुयश जाधव यांना सन्मानित कले. तसेेच केंद्र शासनााने २०१८ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती प्रणव मुुखर्जी याच्या हस्ते ५० लाख रु देेेवुन सन्मान केला आहे.
भारत सरकारच्या युवा कल्याण व क्रिडा मंत्रालयवतीने देण्यात येणा-या सन २०२० च्या अर्जुन पुरस्कारासाठी सुयश जाधव यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर नैपुण्य प्राप्त केल्याबद्दल निवड केली असुन रोख रु.५ लाख व अर्जुनाची कास्य प्रतिमा राष्ट्रपती रामानंद कोविंद यांच्या हस्ते क्रिडा दिनी २९ ऑगस्ट २०२० रोजी राष्ट्रपती भवनात सुयश जाधव यांना देवुन सन्मानित करण्यात येणार आहे. सुयश जाधव यांची अर्जुन पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंह मोहिते - पाटील, संचालिका स्वरुपाराणी मोहिते - पाटील, शंकरराव मोहिते महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते - पाटील, प्राचार्य डाॅ. आबासाहेब देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.