वेळापूर (जि. सोलापूर) : इंडोनेशिया येथील जकार्ता येथे पार पडलेल्या आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत सुयश जाधवने एक सुवर्ण व दोन कांस्य पदके मिळवून अभिमानाने तिरंगा फडकावला़ त्यामुळे वेळापूर ग्रामपंचायत, वेळापूर खो-खो संघटना, इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक टीचर्स असोसिएशन, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक, पत्रकार संघ, माजी खेळाडू यांच्या संयुक्त विद्यमाने सुयशचा नागरी सत्कार करुन भव्य मिरवणूक काढली़गतवर्षी ब्राझील येथे झालेल्या पॅरा आॅलिम्पिक स्पर्धेमध्ये सुयशला पदकाने हुलकावणी दिली होती. मात्र त्यानंतर दिवस रात्र मेहनत व सराव करून सुयशने आशियाई पॅरा गेम्स २०१८ मध्ये भारतासाठी यशस्वी कामगिरी केली. या स्पर्धेत सुयशला ५० मी बटरफ्लाय जलतरणात सुवर्ण पदक तर ५० मीटर फ्री प्रकारात व २०० मीटर प्रकारात कांस्य पदक मिळाले.>शिव छत्रपती पुरस्काराने सन्मानगतवर्षी झालेल्या पॅरा आॅलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या सुयश जाधवला महाराष्ट्र सरकारने शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते़ शिवाय राज्य क्रीडा मार्गदर्शक जलतरण, श्रेणी -१ चे अधिकारी पद ही दिले आहे.राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील ७५ पेक्षा जास्त पदके सुयशने पटकावली आहेत़ आगामी काळात जपानच्या टोकियोमध्ये होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेत सुयश देशाचे भविष्य आहे़- तपन पानेग्रही,सुयशचे क्रीडा मार्गदर्शक
वेळापुरात सुयश जाधवची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 4:48 AM