पंढरपूर : शेतकरी संघटनेच्या चक्काजाम आंदोलनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये. यासाठी मंदिर समितीकडून आज दिवसभर अन्नछत्र चालू ठेवण्यात येणार आहे.
दिवाळी उत्सव सुरू असताना श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार्या भाविकांची संख्या कमी झाली होती. दिवाळीनंतर सलग तीन दिवस सुट्टी आल्याने पून्हा शुक्रवार पासून दर्शनासाठी भाविकांची भली मोठी रांग लागली आहे.
यातच शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्ह्यात चक्काजाम आंदोलनाची सुरू केले आहेत. यामुळे पंढरीत विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे हाल होऊ नये यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने आज दिवसभर अन्नछत्र चालू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.