पहाटे ५ वाजता ‘श्रीं’ची पुण्यतिथी महोत्सवाची काकड आरती मंदिराचे पुजारी यांच्या हस्ते व समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यानंतर मंदिर समितीच्या वतीने चेअरमन इंगळे यांच्या हस्ते ‘श्रीं’ना लघुरूद्र अभिषेक करण्यात आला. सकाळी ११:३० वाजता देवस्थानची नैवेद्य आरती झाली. दुपारी १२ वाजता अक्कलकोट संस्थानने मालोजीराजे भोसले यांचे हस्ते व देवस्थानचे चेअरमन इंगळे यांच्या प्रमुख उपस्थित पुरोहित पुजारी यांच्या मंत्रोच्चारात ‘श्रीं’ना महानैवेद्य दाखविण्यात आले. त्यानंतर सायंकाळी अक्कलकोट शहरातून प्रतिवर्षी होणारा पालखी सोहळा यंदा रद्द करण्यात आला. अशाप्रकारे कोरोनाच्या सावटाखाली हा सोहळा पार पडला. पुण्यतिथीनिमित्त वटवृक्ष मंदिरास पुणे येथील लाईट डेकोरेटर्स पुंडलिक हगवणे, मिलिंद पोकळे व सहकाऱ्यांनी आकर्षक विद्युत रोषणाईची सेवा स्वामीं चरणी अर्पण केली. या प्रसंगी मंदिरात विश्वस्त, सदस्य व सेवेकऱ्यांना मास्क व सॅनिटायजर वापरण्याची सक्ती केली. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त उज्ज्वला सरदेशमुख, गणेश दिवाणजी, गिरीश ग्रामोपाध्ये आदी उपस्थित होते.
फोटो
१०अक्कलकोट-स्वामी समर्थ
ओळी
अक्कलकोट संस्थानच्यावतीने ‘श्रीं’ना महानैवेद्य दाखविताना मालोजीराजे भोसले, महेश इंगळे, गणेश दिवाणजी आदी.