सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समिती निवडणुकीत महाविकास आघाडीला तीन तर भाजप पुरस्कृत समविचारी आघाडीला केवळ एक जागा मिळाली. अर्थ व बांधकाम समिती सभापतीपदी विजयराज डोंगरे तर कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी अनिल मोटे यांची निवड करण्यात आली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत समाजकल्याण समितीच्या सभापतीच्या निवडणुकीत समविचार आघाडीचे सुभाष माने तर महाविकास आघाडीच्या संगीता धांडोरे यांना ३२ मते मिळाली होती. यानंतर चिठ्ठीव्दारे निवड करण्यात आल्यानंतर संगीता धांडोरे याचे नाव निघाले.
त्याचबरोबरच महिला व बालकल्याण समिती सभापतीपदाच्या महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी महाविकास आघाडीच्या स्वाती शटगार याची बहुमताने निवड झाली. स्वाती शटगार यांना ३५ मते पडली तर समविचार आघाडीच्या संगीता मोटे यांना ३१ मते पडली होती. त्यानंतर विषय समिती सभापती निवडणूकीत विजयराज डोंगरे यांना ३४ तर महाविकास आघाडीच्या रणजित शिंदे यांना ३२ मते मिळाली.
दुसºया विषय समितीसाठी महाविकास आघाडीचे अनिल मोटे यांना ३४ तर समविचार आघाडीचे अतुल पवार यांना ३२ मते मिळाली. सभापती निवडणुकीत आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव पराभूत झाले आहेत़ तर चिठ्ठीव्दारे झालेल्या विषय समिती सभापती निवडणुकीत महाविकास आघाडीला तारले. अत्यंत चुरशीने निवडणुक झाले. मतदान करताना सदस्य गोंधळलेले होते़ काहींनी दोन वेळा हात वर केले़ निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून गजानन गुरव यांनी काम पाहिले.